मुंबई : INS Vikrant घोटाळा प्रकरण! भाजपनेते किरीट सोमय्या यांना क्लिनचीट

मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना दिलासा मिळाला आहे. किरीट सोमय्या आणि त्यांचा नगरसेवक मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडला नाही, अशी कबुली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे साखेने न्यायालयात दिली आहे. याबाबत लवकरच सुनावणी होणार आहे

विक्रांत युद्धनौकेचे जतन करण्यासाठी सोमय्या यांनी नागरिकांना आवाहन करून सुमारे ५७ कोटींचा अपहार केला, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या यांनी आर्थिक निधी जमा केला; पण तो अधिकृतपणे राज्यपालांकडे जमा केला नाही, असा आरोप होता; मात्र सोमय्या यांनी आरोपांचे खंडन केले होते. या प्रकरणात सखोल चौकशी केली. मात्र सोमय्या यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडला नाही, असे न्यायालयात सांगण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *