बदलापूर (ठाणे): मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या तरुणांच्या अलिशान कारचा मुंबई-वडोदरा महामार्गावर (बदलापूरजवळ) अत्यंत भीषण आणि थरारक अपघात झाला आहे. ताशी तब्बल २५१ किलोमीटर अशा अंगावर काटा आणणाऱ्या वेगाने धावणारी एक 'बीएमडब्ल्यू कन्व्हर्टेबल' (BMW Convertible) कार महामार्गावरील दुभाजकाला (Divider) धडकून अनेक वेळा उलटली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, कारमधील प्रसिद्ध स्थानिक फुटबॉल खेळाडू योगेश किशन नेगी (वय २६) आणि त्याची मैत्रिण रेबेका बाबू जेकब (वय २२, रा. वांद्रे) यांचा घटनास्थळीच वेदनादायक मृत्यू झाला.
वाढदिवसाचे सेलिब्रेशन बेतले जीवावर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (२१ जून २०२६) पहाटे २:३० ते ३:०० वाजण्याच्या सुमारास हा अपघात एरंजार, बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. योगेश नेगी याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे मित्र एकत्र आले होते. पार्टी संपल्यानंतर ते रात्रीच्या वेळी लाँग ड्राईव्हसाठी अंगद गिल (वय २४) याच्या वडिलांच्या मालकीच्या लक्झरी स्पोर्ट्स कारमधून बाहेर पडले होते. पनवेलकडून टिटवाळ्याच्या दिशेने जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार महामार्गावरील दुभाजकाला जाऊन धडकली.
५०० मीटर अंतरावर फेकले मृतदेह, अंगाचे तुकडे विखुरले
अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की, कारचे छप्पर (Hood) उघडे असल्याने गाडीतील तरुण आणि तरुणी थेट हवेत उडून तब्बल ५०० मीटर दूर अंतरावर फेकले गेले. दुर्घटनास्थळापासून ५० ते १०० मीटरच्या परिसरात त्यांच्या शरीराचे अवयव विखुरले गेले होते. अपघाताच्या काही सेकंद आधी कारच्या आतून रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कारचा स्पीडोमीटर २५१ किमी प्रतितास दाखवत आहे.
अद्याप वाहतुकीसाठी खुली नसलेल्या महामार्गावर थरार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले की, हा अपघात ज्या १० पदरी मुंबई-वडोदरा महामार्गाच्या टप्प्यावर झाला, तो रस्ता अजूनही बांधकाम सुरू असलेला (Under-Construction) असून सार्वजनिक वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आलेला नाही. महामार्ग रुंद आणि रिकामा असल्याने तरुणांनी गाडीचा वेग प्रचंड वाढवला होता. तिथे अद्याप पथदिवे (Street Lights) नसल्यामुळे अंधारात चालकाला दुभाजकाचा अंदाज आला नाही.
या अपघातातून कारचा मालक आणि चालक अंगद गिल हा एकमेव जिवंत वाचला असून तो कल्याण येथील फोर्टिस रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) गंभीर अवस्थेत आहे. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला गाडी कोण चालवत होते याबाबत संभ्रम होता, मात्र आता तपासात स्पष्ट झाले आहे की अंगद गिलच गाडी चालवत होता. पोलिसांनी अंगदविरुद्ध सदोष मनुष्यवध, धोकादायक ड्रायव्हिंग आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये https://punenews24.in/
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




