
Pune : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्च अखेरपर्यंत सुरू होणार, ही घोषणा म्हणजे निव्वळ पोकळ गप्पा आहेत. जिल्हा न्यायालय ते बालेवाडी स्टेडियम यादरम्यानच्या मेट्रो मार्गाच्या पाहणीत १४ स्थानकांपैकी केवळ दोन ते तीन स्थानकांची ९० टक्के किंवा त्याहून अधिक कामे झाली असून, उर्वरित सर्वच स्थानकांची बरीच कामे बाकी आहेत. अनेक स्थानकांवर अपेक्षित कामगारांची संख्या दिसून येत नाही.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी स्वरूपात (पीपीपी) हा प्रकल्प विकसित केला जात आहे. 'पुणे आयटी सिटी मेट्रो' या कंपनीतर्फे हे काम केले जात आहे. मार्च अखेरपर्यंत मेट्रो मार्ग सुरू करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता; परंतु हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, काही मेट्रो स्थानकावरील कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधल्यानंतर पुढील चार ते पाच महिने कामे पूर्ण होण्यास लागतील, असे त्यांनी सांगितले.
|
|
हिंजवडी-शिवाजीनगर दरम्यानची काही स्थानके सुरू करून मेट्रो सुरू करण्यासाठी सुरक्षा तपासणीचा प्रस्ताव ‘सीएमआरएस’ला पाठवावा लागतो. प्राथमिक पाहणीअंती सुचविण्यात आलेल्या सूचना व अटी-शर्तींची पूर्तता केल्यानंतरच अंतिम तपासणी होऊन व मेट्रो सुरू करण्याची परवानगी मिळते. सर्व मेट्रो प्राधिकरणांना हीच प्रक्रिया पार पाडावी लागते. प्राथमिक तपासणी व अंतिम तपासणी यामध्ये साधारणतः दोन ते तीन महिने किंवा कधी त्यापेक्षा अधिक कालावधी लागतो. हा प्रस्तावच अजून केंद्रीय स्तरावर पाठविला गेला नसल्याने हिंजवडी मेट्रोची मार्च २०२६ची ‘डेडलाइन’ पुढे जाणार हेच स्पष्ट होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये, ‘कोणत्याही परिस्थितीत मार्च २०२६ची डेडलाइन वाढवून मिळणार नाही. कामे वेळेत काम पूर्ण करा,’ अशी तंबीच ‘पीएमआरडीए’ आणि ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’ कंपनीला दिली होती. मात्र, दुर्दैवाने प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होते की नाही, याकडे निवडणुकीच्या धामधुमीत दुर्लक्ष झाले. त्यामुळे मूळ आराखड्यानुसार मार्च २०२५ ला पूर्ण होणारा प्रकल्प या मुदतीच्या वर्षभरानंतरही पूर्ण होणार नाही याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Pune Metro : मार्चमध्ये मेट्रो सुरू करण्याच्या घोषणा, पण वास्तव वेगळंच; हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोची डेडलाईन पुन्हा पुढे जाणार?”