सोन्याच्या भावात मोठी घसरण! सलग चौथ्या दिवशी भाव कोसळले; मुंबई, पुणे, नागपूरमधील २४ आणि २२ कॅरेटचे ताजे दर जाणून घ्या!

मुंबई : पितृपक्ष सुरू होताच सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण नोंदवली गेली असून, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या तेजीत आता मोठी नरमाई पाहायला मिळत आहे.

बाजारपेठेतील तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किंमतीत उच्चांकी वाढ सुरू होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल ११ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ झाली होती. मात्र, सप्टेंबर महिन्याची सुरुवात झाल्यापासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत असून, सप्टेंबरमध्ये आतापर्यंत सोन्याच्या भावात सुमारे ७ टक्क्यांची मोठी घट झाली आहे.

गेल्या काही दिवसांमधील सातत्यपूर्ण घसरणीमुळे ग्राहकांना आता सोने खरेदी करणे काहीसे स्वस्त पडत आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूरसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये २४ कॅरेट (शुद्ध सोने), २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने) आणि १८ कॅरेट सोन्याचे दर बरेच खाली आले आहेत. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या या सततच्या घसरणीमुळे सोन्याच्या बाजारपेठेत मंदीचे वातावरण असून, ग्राहकांमध्ये मात्र सोनं खरेदीसाठी उत्सुकता वाढली आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *