
Mumbai : निवडणुकीच्या तोंडावर सिडकोकडून नवी मुंबईमध्ये ४५०८ घरांची लॉटरी काढण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर घराची विक्री होणार आहे. आज सायंकाळी ४ वाजेपासून (22 नोव्हेंबर 2025) ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सदनिकांसाठी राज्य सरकारकडून २.५ लाख रूपयांची सब्सिडी दिली जाणार आहे. स्वप्नातील घरासाठी 21 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. अर्ज केलेल्या पात्र अर्जदारांना 28 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजेपासून त्यांच्या आवडीचे घर निवडता येणार आहे.
मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या प्रत्येकालाच आपल्या स्वप्नातील घर घ्यायचे असते. पण प्रचंड वाढलेल्या किंमतीमध्ये घर घेता येत नाही. पण सिडकोकडून स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नवी मुंबईमध्ये ४५०८घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य" या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथे घरे उपलब्ध करून दिली आहेत. अर्जदार आपल्या आवडीचे घर निवडू शकणार आहे
|
|
सिडकोकडून इतिहासात पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना राबवण्यात आली आहे. ४५०८ घरांसाठी सिडकोकडून लॉटरी अथवा सोडत काढली जाणार नाही तर थेट आवडीचे घर निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर साकारता येणार आहे. सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केलेय.
तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथे सिडकोच्या गृहसंकुलांतील उर्वरित 4,508 घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ४५०८ घरांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता 1,115 तर अल्प उत्पन्न गटाकरिता 3,393 घरे उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रु. 2.50 लाख अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सिडकोकडून ठरवण्यात आलेल्या किंमतीत आणखी घट होणार आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




