सातारा: लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार वर्षे वारंवार अत्याचार; पाटणमधील खासगी खासगी शिक्षकाला पोलिसांची बेडी

सातारा: पाटणमधून एक अत्यंत संतापजनक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. "मला तू खूप आवडतेस, मी माझ्या पत्नीला सोडून तुझ्याशी लग्न करीन," असे खोटे आणि प्रलोभन दाखवून एका खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकाने एका महिलेवर गेल्या चार वर्षांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पाटण पोलीस ठाण्यात संबंधित नराधम शिक्षकाविरुद्ध गांभीर्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, संशयित आरोपी हा पाटण येथील एका खासगी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने पीडित महिलेला विविध प्रलोभने दाखवून विश्वासात घेतले. लग्नाचे आमिष दाखवण्यासोबतच नोकरीचे आमिष आणि विविध धमक्या देत त्याने गेल्या चार वर्षांपासून सातत्याने महिलेचे लैंगिक शोषण केले. आरोपीने महिलेला खोली भाड्याने घेऊन वारंवार अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर, या प्रकाराबद्दल कोणाला वाच्यता केल्यास किंवा विरोधात गेल्यास आरोपी तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता.

या सततच्या त्रासामुळे आणि ब्लॅकमेलिंगमुळे पीडित महिला पूर्णपणे खचली होती. अखेर तिने धाडस दाखवत पाटण पोलिसात जाऊन या संपूर्ण अमानुष प्रकाराची सविस्तर तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पावले उचलत आरोपी शिक्षकाला अटक केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व अधिकारी वर्ग करत आहेत. या घटनेमुळे सातारा आणि पाटण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *