India Fighter Jet Tejas : सध्याच्या जमान्यात सगळ्याच देशांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहेत. कुठल्याही युद्धात एअर फोर्सची भूमिका निर्णायक असते. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी आपण हे पाहिलं. सध्या अनेक मोठ्या देशांकडे 4.5 जनरेशनची फायटर जेट्स आहेत. अमेरिका, चीन, रशियासह काही निवडक देशांकडे 5 व्या जनरेशनची स्टेल्थ फायटरं विमानं आहेत. कुठल्याही युद्धाची दिशा बदलण्यासाठी फायटर जेट्स आवश्यक असतात. भारताकडे आज राफेल, सुखोई MKI यांच्या रुपाने अत्याधुनिक लढाऊ विमानं आहेत. भारतासाठी सर्वात जास्त महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे ‘तेजस’. भविष्यात तेजस फायटर विमानांना भारतीय हवाई दलाचा कणा बनवायचा आहे. त्यासाठी तेजसच्या प्रोजेक्टवर वेगाने काम सुरु आहे.
मूळात तेजस फायटर जेट निर्मितीचा कार्यक्रम भरपूर रखडला. ठरलेल्या कालमर्यादेपेक्षा बरीच वर्ष लेट झाला. 1980 च्या दशकात भारत आणि स्वीडन दोन्ही देशांनी मिळून एकाचवेळी त्यांच्या एअरफोर्सचं आधुनिकीकरण करण्यासाठी सिंगल इंजिन हलक्यावजनाचं फायटर विमानं बनवण्याचा कार्यक्रम सुरु केला. विजेन ताफ्याची जागा घेण्यासाठी स्टॉकहोल्मने साब JAS-39 ग्रीपेन फायटर विमान बनवण्याचा कार्यक्रम सुरु केला. भारतात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने तेजस विमान निर्मितीचा कार्यक्रम सुरु केला. मिग-21 फायटर विमानं टप्याटप्याने निवृत्ती करुन देशांतर्गत विमान बांधणीचं कौशल्य विकसित करणं यासाठी तेजसचा कार्यक्रम सुरु करण्यात आलेला.
ग्रीपेनने स्वत:ची एक विश्वासहर्ता बनवली
दोन्ही विमानं विविधता, कमी किंमत, डॉग फाइट म्हणजे हवेतून हवेत लढाई, हवेतून जमिनीवरील लक्ष्यभेद, टेहळणी अशी वेगवेगळी उद्दिष्ट्य ठेवून बांधण्यात आली. यामध्ये स्वीडनच्या ग्रीपेनने स्वत:ची एक विश्वासहर्ता बनवली. जगात मान्यता असलेलं हे फायटर जेट आहे. ग्रीपेन फायटर विमानं अनेक देशांनी विकत घेतलं असून त्यात सातत्याने सुधारणा सुरु असतात. जुलै 2025 मध्ये थायलंड-कंबोडिया हवाई संघर्षात ग्रीपेनने आपली क्षमता दाखवली. थायलंडने F-16 सह ग्रीपेनला सुद्धा एअर ऑपरेशन्समध्ये उतरवलं होतं.
नवं तेजस किती भारतीय?
तेजस हे स्वदेशी बनावटीचं मल्टीरोल फायटर विमान आहे. वेगवेगळी कार्य करण्याची या विमानाची क्षमता आहे. तेजसच्या नव्या आवृत्तीमध्ये 70 टक्के उपकरणं भारतीय आहेत. यात स्वदेशी AESA रडार सिस्टिम आहे. संरक्षण तंत्रज्ञानात आत्मनिर्भरता हे भारताचं मुख्य उद्दिष्टय आहे. Mk1A वर्जनच्या निर्मितीमध्ये भारताने बराच मोठा पल्ला गाठला आहे. टेक्निकली बऱ्याच गोष्टी साध्य करुनही तेजसवर अजूनही अपेक्षेनुसार प्रदर्शन नसल्याचा, विलंबाचा ठपका ठेवण्यात येतो.
तेजसच्या विलंबामागची कारणं काय?
तेजस हे खरोखर चांगलं विमान आहे. पण तेजस मागे का राहिलं? तेजसच्या डिझाईनमध्ये, इंजिनिअरींगमध्ये काही कमतरता होत्या का?. मूळात तेजसला विलंब होण्यामागे मुख्य कारण आहे निर्णय क्षमतेचा अभाव, नोकरशाहीचे अडथळे, कमकुवत संस्थात्मक प्रक्रिया, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, परदेशी पुरवठादारांवर अवलंबित्व ही तेजसच्या विलंबामागची मुख्य कारणं आहेत. व्यवस्थेतल्या आव्हानांमुळे तेजसला विलंब झाला. लोकांचा दृष्टीकोन बदलला. मूळात तेजसची ज्या उद्दिष्टयांसाठी निर्मिती करण्यात आलेली. ती त्याने साध्य केली.
ग्रीपने विमान प्रोजेक्ट सुरु झाल्यानंतर किती वर्षात आकाशात झेपावलं?
जून 1982 मध्ये ग्रीपेनच्या प्रोजेक्टची सुरुवात झालेली. जून 1996 साली स्वीडीश एअर फोर्सने या विमानांचा वापर सुरु केला. बरोबर ग्रीपेनच्या निर्मितीला 14 वर्ष लागली. ड्राकेन आणि विजेन या फायटर विमान बांधणीचा अनुभव स्वीडनकडे होता. हे सुद्धा ग्रीपेन लवकर आकाशात झेपावण्यामागचं एक कारण आहे.
स्वीडनच ग्रीपेन विमान किती देशांनी विकत घेतलय?
आतापर्यंत वेगवेगळ्या आवृत्तीची 270 ग्रीपेन विमान बनवण्यात आली आहेत. वर्षाला 36 विमानं बनवण्याचं टार्गेट आहे. स्वीडनच्या लिंकोपिंग आणि ब्राझीलमधील गावियो येथे ग्रीपेनचे कारखाने आहेत. ग्रीपेनच्या निर्यातीची ऑर्डर सतत वाढत चालली आहे. नुकतीच कोलंबियाने 17 ग्रीपेन E/F jets ची ऑर्डर दिली. 2026 ते 2032 या कालावधीत या विमानांची स्वीडनला पूर्तता करावी लागणार आहे. थायलंड आणखी ग्रिपेन विमानं विकत घेण्याचा विचार करतोय. कॅनडा आणि अन्य देशांसोबत चर्चा सुरु आहे. त्यांचे प्रस्ताव आहेत.
ग्रीपेनच्या यशाचं कारण काय?
ग्रीपेन विमानांच्या ऑपरेशन्सचा खर्च कमी आहे. या जेटमध्ये ES-05 AESA रडार आणि सेन्सर फ्यूजन सिस्टिम आहे. सतत या प्रोजेक्टला होणारं फंडिंग, वेगाने होणारी निर्णय प्रक्रिया, नोकरशाहीचा कमी सहभाग, GE F414 सारख्या इंजिन्ससाठी आंतरराष्ट्रीय भागीदारी, सेटबॅक नंतरही माघार न घेणारी मॅनेजमेंट, खरंतर 1989 साली या विमानाचं प्रोटोटाइप कोसळलं होतं. स्पष्ट उद्दिष्टय, वेगवान अंमलबजावणी त्यामुळे जागतिक स्पर्धेमध्ये ग्रीपेन आपली घातकता आणि वेगळी ओळख टिकवून आहे.
नव्या तेजस Mk1A चं स्टेटस काय?
तेजस विमान ऑपरेशनल म्हणजे त्याचा वापर सुरु व्हायला 33 वर्ष लागली. सध्या 40 तेजस Mk1 विमानं सेवेत आहेत. लवकरच तेजस Mk1A ही नवीन आवृत्ती सेवेत येईल. हे विमान म्हणजे एवियॉनिक पॅकेज असेल. अस्त्र आणि असराम मिसाइल्सच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या विमानामध्ये अमेरिकन कंपनीचं GE F404 इंजिन असेल. अस्त्र, असराम ही नजरेपलीकडच्या लढाऊ विमानांचा वेध घेणारी क्षेपणास्त्र आहेत. GE F404 इंजिन्सच्या मर्यादीत पुरवठ्यामुळे तेजस Mk1A च आगमन रखडलय.
या विमानामुळे काय झालं?
मार्च 2026 पर्यंत 24 तेजस Mk1A सेवेत आणण्याचा HAL चा मानस आहे. पण या विमानांचं उत्पादन इंजिन पुरवठ्यावर अवलंबून आहे. एकूण 180 तेजस Mk1A आणि Mk2 विमानांची ऑर्डर देण्यात आली आहे. Mk2 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला हवेत झेपावेल अशी शक्यता आहे. तेजसमध्ये 70 टक्के भाग हे भारतात बनवण्यात आलेले आहेत. ब्राह्मोस NG क्षेपणास्त्र, AESA रडारने तेजसला अजून घातक होईल. उंचावरील युद्ध लढण्याची तेजसची क्षमता आहे. या प्रोग्रॅममुळे भारताच्या अत्याधुनिक फायटर जेट बांधणीच्या, डिझाईनच्या कौशल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
वर्षाला किती तेजसची निर्मिती?
मिग-21 रिटायर झाल्यामुळे सध्या इंडियन एअर फोर्सच्या स्क्वाड्रन्सची संख्या कमी झाली आहे. एकाचवेळी चीन-पाकिस्तान या आघाड्यांवर युद्ध लढण्यासाठी भारताकडे 42 स्क्वाड्रन असणं गरजेच आहे. आधी वर्षाला 8 ते 16 तेजस विमानांची बांधणी व्हायची. ही संख्या आता 24 पर्यंत पोहोचली आहे. काही विमानं पूर्ण झाली आहेत. पण इंजिन नसल्यामुळे बांधणी पूर्ण होऊ शकलेली नाही.
AMCA विमान निर्मितीचा कार्यक्रम
तेजसच्या निर्मितीला भले विलंब झाला. पण भारत आता पाचव्या पिढीचं AMCA विमान विकसित करण्यावर वेगाने काम करत आहे. हे स्टेल्थ विमान असेल. जे रडारला अजिबात दिसणार नाही. तेजसच्या निर्मितीमध्ये टेक्निकल पेक्षा व्यवस्थेतली आव्हानं जास्त होती. नोकरशाहीकडून मिळणाऱ्या मंजुऱ्या, DRDO, ADA, HAL अशा वेगवेगळ्या संस्था यामध्ये सहभागी होत्या. 1998 सालच्या पोखरण अणू चाचणीनंतर आंतरराष्ट्रीय निर्बंध आले. त्यामुळे सुद्धा प्रोजेक्टला विलंब लागला.
शहर
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
महाराष्ट्र
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- वर्धा: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात निलंबित विद्यार्थ्यांसाठी तीव्र आंदोलन; प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ
- पुणे: लक्ष्मी रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयाला भीषण आग; ७ अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल, मोठी दुर्घटना टळली
- कोल्हापुर: बिबट्याची दहशत! फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर उसाच्या शेतात शिरला बिबट्या, थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम सुरू
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!



























Subscribe to my channel



