Rohit Paudel Post Match Presentation ENG vs NEP T20i World Cup 2026Image Credit source: Social Media
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली. या स्पर्धेत मुख्य संघांसह नवखे संघही सहभागी झाले आहेत. नवख्या संघांच्या कामगिरीमुळे त्यांना लिंबुटिंबु म्हणून गृहित धरलं जातं. मात्र या स्पर्धेच्या सुरुवातीलाच तुलनेत नवख्या असणार्या संघांनी आपल्याला गृहित धरु नये, हे आपल्या कामगिरीतून दाखवून दिलंय. नेदरलँड्सने स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला जेरीस आणलं होतं. यूएसएने गतविजेत्या टीम इंडियाला झुंजवलं. त्यानंतर आज 8 फेब्रुवारीला नेपाळने इंग्लंडला रडकुंडीला आणलं. इंग्लंडचा नेपाळ विरुद्ध अवघ्या 4 धावांनी विजय झाला. नेपाळने 185 धावांचा पाठलाग करताना जोरदार लढत दिली. मात्र नेपाळचे प्रयत्न अवघ्या 4 धावांनी कमी पडले. नेपाळला 20 ओव्हरमध्ये 180 धावांपर्यंतच पोहचता आलं.
इंग्लंडने हा सामना जिंकून आपली लाज राखली आणि उलटफेर होण्यापासून स्वत:चा बचाव केला. इंग्लंड विरूद्धच्या या पराभवानंतर नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल याने त्याला आपल्या संघातील खेळाडूंचा अभिमान असल्याचं म्हटलं. तसेच रोहितने आपण इथे (स्पर्धेत) फक्त सहभागी व्हायला आलो नाहीत, असं म्हणत इतर संघांना बजावलंय. रोहितने काय भावना व्यक्त केल्या हे जाणून घेऊयात.
रोहितने काय म्हटलं?
“मला माझ्या संघाचा अभिमान आहे. मुलांनी (खेळाडूंनी) विजयासाठी स्वत:ला झोकून दिलं. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आलो तेव्हा आम्हाला विश्वास होता की आम्ही चांगली कामगिरी करु शकतो. आम्ही इथे फक्त सहभागी होण्यासाठी आलेलो नाहीत”, असं म्हणत रोहितने इतर संघांना सतर्क राहण्याचा इशारा दिला.
“आम्ही पूर्ण प्रयत्न केले”
“निकाल आमच्या बाजूने लागला नाही. मात्र आम्ही सर्व आघाड्यांवर 100 टक्के प्रयत्न केले. सॅम करन याने शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली. आम्ही सामन्याचा शेवट विजयाने करण्यासाठी प्रयत्न करु”, असंही रोहितने नमूद केलं.
रोहित पौडेलचा थेट इशारा
Nepal Captain said “Disappointment is there but I am proud of my team – we had the belief when we came to the World Cup, we didint come here just to participate”. pic.twitter.com/GegY5hjcBD
— Johns. (@CricCrazyJohns) February 8, 2026
नेपाळचे टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उर्वरित सामने
दरम्यान नेपाळ या पराभवासह या मोहिमेत विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. नेपाळचा या स्पर्धेसाठी सी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. नेपाळ आपल्या पुढील 3 सामन्यांत अनुक्रमे इटली, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलँड विरुद्ध भिडणार आहे. नेपाळला पुढील फेरीत पोहचण्यासाठी या 3 सामन्यांत विजय मिळवणं महत्वाचं ठरणार आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



