Eknath Shinde : 'महाराष्ट्र म्हणजे देशाचं ग्रोथ इंजिन..', CM एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Eknath Shinde : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी बोलताना देशाला स्वांतत्र्य मिळवून देणाऱ्या प्रत्येकाला विनम्र अभिवादन, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर घटनाकारांनाही मनापासून विनम्र अभिवादन. हे वर्ष महाराष्ट्राचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. या वर्षात महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती, विकास हाच ध्यास घेऊन सरकार काम करत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.

Republic Day : प्रजासत्ताक दिनानिमित्त PM मोदींकडून देशवासियांना शुभेच्छा; पद्म पुरस्कार विजेत्यांचेही केले अभिनंदन

सर्व क्षेत्रात आघाडी घेतलेलं हे महाराष्ट्र राज्य देशाचं ग्रोथ इंजिन ठरलं आहे. महाराष्ट्र सर्व गोष्टीत आघाडीवर आहे. महाराष्ट्र परदेशी गुणंतवणुकीत आघाडीवर आहे. महाराष्ट्र पायाभूत सुविधांमध्ये आघाडीवर आहे. नुकताच महाराष्ट्राला स्वच्छ राज्य म्हणून पुरस्कार मिळाला याचा आभिमान आहे. सामान्यांच्या जीवनात चांगले आंनदाचे दिवस यावे ही शुभेच्छा देतो, असं शिंदे पुढे म्हणाले आहेत.

देश आर्थिक महासत्तेकडे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास जोरात होत आहे. देशाचे नावलौकिक होत आहे देशाचे नाव आदराने घेतलं जात आहे. पंतप्रधान मोदी यांचं ५ ट्रिलियन डॉलरचे जे स्पप्न आहे ते पुर्ण करण्यासाठी आपलं राज्य १ ट्रिलियन डॉलरचे गोल पुर्ण करेल असा विश्वास देतो, आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो, म्हणत १ ट्रिलियन डॉलरचे गोल पुर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिलं आहे.

यावेळी त्यांना मराठा समाजालाही शुभेच्छा दिल्या, आपलं राज्य सर्वांना सोबत घेऊन जाणारे राज्य आहे. येथे शांतता सुव्यवस्था राखली जाते, ही आपली परंपरा आहे, आजचा दिवस आपल्या भाग्याचा दिवस आहे, सर्वांचं मनापासून आभिनंदन करतो असं  मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply