पुणे: केंद्रीय गृहमंत्री यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तावर जाताना मद्यधुंद अवस्थेतील एका पोलीस हवालदाराचे पोलिस व्हॅनवरील नियंत्रण सुटल्याने व्हॅनने चार वाहनांना धडक दिल्याची घटना टिळक रस्त्यालगतच्या देशमुखवाडीत शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी घडली. अपघातात दोन कार, एक तीनचाकी टेम्पो आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने धडक बसलेल्या वाहनांमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पोलिस हवालदार बाळासाहेब वसंत खैरे (वय ५२) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. खैरे हा पोलिसांच्या मोटार वाहन विभागात कार्यरत आहे. या संदर्भात अभिषेक गोविंद लिमये (वय ३८, रा. देशमुखवाडी, सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शनिवारी होणाऱ्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर टिळक रस्त्यावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी या परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने खैरे याने पोलीस व्हॅन देशमुखवाडीतील अरुंद गल्लीतून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारला त्याने जोरदार धडक दिली. त्या धडकेमुळे संबंधित कार पुढील कार आणि टेम्पोवर आदळली. त्यानंतरही खैरे याने व्हॅन पुढे नेत पुन्हा त्या कारला धडक दिली आणि भिकारदास मारुती रस्त्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, चैतन्य साठे आणि विश्वनाथ लिमये यांनी पोलीस व्हॅन अडवून चालकाला पकडून ठेवले. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात अभिषेक लिमये व कुंदन साठे यांच्या कार, अद्वैत खळदकर यांची दुचाकी तसेच विश्वनाथ लिमये यांच्या तीनचाकी टेम्पोचे मोठे नुकसान झाले. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी सांगितले की, चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये त्याने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम १८४ व १८५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, ३२४ (४) आणि ३२४ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



