ठाणे शहरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी, गारेगार आणि पर्यावरणपूरक व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या 'पीएम ई-बस सेवा' योजनेंतर्गत (PM e-Bus Sewa Scheme) ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रमास (TMT) १०० वातानुकूलित (AC) इलेक्ट्रिक बसेस मंजूर करण्यात आल्या आहेत. यापैकी तब्बल ९८ ई-बसेस ठाण्यात दाखल झाल्या असून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) सुमारे ५५ बसेसची अधिकृत नोंदणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मात्र, प्रत्यक्ष गाड्या रस्त्यावर धावण्यासाठी आवश्यक असलेल्या चालकांची (Drivers) तीव्र कमतरता भासत असल्याने या नव्या कोऱ्या ९८ ई-बसेस गेल्या दीड महिन्यांपासून कोलशेत आगारात (Kolshet Depot) धूळखात उभ्या आहेत.
चालक मिळण्यात अडचणी आणि तुटपुंज्या वेतनाचा फटका:
टीएमटी प्रशासनाने या बसेसच्या संचलन व देखभालीसाठी (GCC Model) कंत्राटदाराची (Contractor) नियुक्ती केली आहे. नियमानुसार चालक उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदाराचीच आहे. परंतु, सध्याच्या महागाईच्या काळात चालकांना मिळणारे मानधन हे या समस्येचे मुख्य कारण ठरले आहे. ठेकेदाराकडून चालकांसाठी सुमारे ३१,००० रुपये महिना वेतन निश्चित केले जाते; मात्र पीएफ आणि इतर विविध कपातींनंतर चालकांच्या हातात प्रत्यक्ष केवळ २४,००० रुपयांच्या आसपास पगार पडतो. ठाण्यासारख्या शहरात राहणीमानाचा अफाट खर्च आणि घरभाडे विचारात घेता हे वेतन अत्यंत अपुरे पडत असल्याने चालक या नोकरीकडे पाठ फिरवत आहेत, परिणामी कंत्राटदाराला पुरेसे मनुष्यबळ गोळा करण्यात यश आलेले नाही.
प्रवाशांची कोंडी आणि टीएमटीचे आगामी नियोजन:
सध्या ठाणे शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या पुढे गेली असून रस्त्यांवर सार्वजनिक वाहतुकीची प्रचंड गरज आहे. टीएमटीच्या ताफ्यात सध्या ४०७ बसेस असून रोज सुमारे ३७० ते ३८० बसेस रस्त्यावर धावतात. वाढत्या गर्दीचा विचार करता ताफ्यात नव्या बसेस तातडीने सुरू होणे गरजेचे असताना, आगारात गाड्या तयार असूनही नियोजनशून्यतेमुळे ठाणेकरांचा एसी प्रवास लांबणीवर पडला आहे. आगामी काळात टीएमटीच्या ताफ्यात १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून व केंद्र सरकारच्या योजनांमधून एकूण ४०३ ई-बसेस तसेच १०० सीएनजी बसेस आणि घोडबंदर मार्गासाठी १० डबलडेकर एसी बसेस दाखल करण्याचे नियोजन आहे. टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी ठेकेदाराला चालक भरती वेगाने करून गाड्या त्वरित प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
शहर
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- नागपूर: अंबाझरीजवळ स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ भरधाव कार नाल्यात कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
- मुंबई: शायना एनसींच्या कथित निषेध आंदोलनावरून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!
- पुणे: आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर! एफसी रोडवर महापालिकेची धडक कारवाई; तब्बल २४ हजार ५०० चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त!
महाराष्ट्र
- रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन
- पुणे: जे. एम. रोड खाऊ गल्लीत 'एफडीए'चा धडक कारवाईचा दणका; १७ पैकी ८ आस्थापने बंद, ६ परवाने निलंबित
- सांगली: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीवेळी जयंत पाटील चीनमध्ये तोंड लपवून बसले; भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
गुन्हा
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा



























Subscribe to my channel




