ठाणे: ठाण्यातील गाजलेल्या प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, या संवेदनशील मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर खासदार नरेश म्हस्के यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येसारख्या दुर्दैवी आणि गंभीर गुन्हेगारी प्रकरणाचे कोणत्याही प्रकारचे राजकारण करू नये, असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, या प्रकरणातील आरोपी कोणीही असला आणि तो कितीही जवळचा किंवा ओळखीचा जरी असला, तरी मी त्याला कधीही पाठीशी घालणार नाही आणि समर्थन देणार नाही, अशी ठाम भूमिका खासदार नरेश म्हस्के यांनी जाहीर केली आहे.
ठाण्यात झालेल्या प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणानंतर विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विशेषतः उद्धव सेनेच्या (ठाकरे गट) नेत्यांनी या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर आणि स्थानिक नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव सेनेच्या नेत्यांवर अत्यंत कडक शब्दामध्ये ताशेरे ओढले. गुन्हेगारीच्या या गंभीर घटनेवर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न विरोधक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
नरेश म्हस्के यांनी पुढे स्पष्ट केले की, कायद्याचे राज्य राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यात जो कोणी दोषी असेल, त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, या मताशी आपण ठाम आहोत. या प्रकरणात कोणतीही राजकीय पक्षाची ढवळाढवळ किंवा विनाकारण रंग देण्याचे प्रकार थांबवले पाहिजेत. ज्या मित्राला सख्ख्या भावासारखे जपले, त्याच मित्राच्या हत्येमुळे ठाणे शहरात मोठी खळबळ उडाली होती आणि हळहळ व्यक्त केली जात होती. अशा दुर्दैवी घटनेवर राजकारण करून विरोधक केवळ स्वार्थी राजकारण साधत आहेत, असा आरोपही म्हस्के यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन दोषींना फाशी किंवा कठोर शिक्षा व्हावी, अशीच भूमिका मृत पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांची आणि सर्वसामान्यांची आहे. त्यामुळे या संवेदनशील प्रकरणाला चुकीचे वळण देण्याचे किंवा राजकीय रंग देण्याचे उद्योग विरोधकांनी तात्काळ बंद करावेत, असा इशाराही नरेश म्हस्के यांनी आपल्या वक्तव्यातून दिला आहे.
शहर
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
महाराष्ट्र
- कोल्हापूर: दिवाळी सणात कोल्हापुरातील 'सीपीआर' रुग्णालयाची ओपीडी दोन दिवस राहणार बंद; आणीबाणी व आपत्कालीन सेवा २४ तास सुरू!
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ



























Subscribe to my channel




