Dharashiv Crime News : तुळजापूर तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाची धाड, 5 लाखांची दारु जप्त

Dharashiv Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाराशिव जिल्ह्यातील खडकी तांडा येथे साडेपाच लाखांची अवैध गावठी दारू आणि निर्मितीचे साहित्य पकडले. या कारवाईमुळे धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणा-यांवर जरब बसेल अशी चर्चा सुरु आहे. 

खडकी तांडा येथे मोठ्या प्रमाणात अवैध गावठी निर्मिती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. याच अनुषंगाने सापळा रचून तब्बल पाच लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.

Fake Doctor In Mumbai : हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी निघाला बोगस डॉक्टर; रुग्णांना द्यायचा रुग्णांना इंजेक्शन आणि सलाइन

या प्रकणी तिघांवर तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुकीची धांदल सुरु असतानाच ही कारवाई झाल्याने बेकायदेशिर व्यवसाय करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *