Devisingh Shekhawat : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वी, हृदयविकाराचा धक्का आल्याने देवीसिंह शेखावत यांना पुण्यात केईएम हॉस्पिटलला दाखल केले होते. आज सकाळी 9.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आज सायंकाळी 6 वाजता त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत.

शेखावत राजकारणात सक्रिय होते. त्यांनी आमदार म्हणूनही काम पाहिलं आहे. देवीसिंह शेखावत यांचा 7 जुलै 1965 रोजी प्रतिभा पाटील यांच्यासोबत विवाह झाला होता. देवीसिंह शेखावत हे अमरावती शहराचे पहिले महापौर होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते.

सुरुवातीच्या काळात देवीसिंह शेखावत यांनी रसायन शास्त्राचे प्राध्यापाक म्हणून काम पाहिलं होतं. 1972मध्ये मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएचडी दिली होती. विद्या भारती शिक्षण संस्था या त्यांच्या संस्थेचे ही ते काम पाहत होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली.

अमरावतीचे महापौर ते आमदार आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. मात्र, 1995च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *