
दिल्लीतील हत्या प्रकरणावरुन संपूर्ण देशभरात खळबळ माजलेली असताना रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यातच आता श्रद्धा वालकरची हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाने पोलिसांकडे आपल्याला गांजाचं व्यसन असल्याचा खुलासा केला आहे. इतकंच नाही, तर १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केली तेव्हा आपण गांजाच्या प्रभावाखाली होतो असंही त्याने पोलिसांना सांगितलं असल्याची सूत्रांची माहिती आहे. आफताबच्या या कबुलीमुळे आता या तपासाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
चौकशीदरम्यान आफताबने पोलिसांना सांगितलं की, श्रद्धा आपल्याला नेहमी गांजाचं व्यसन करत असल्याने ओरडायची. हत्येच्या दिवशी दोघांमध्ये घरखर्च तसंच मुंबईतून दिल्लीत सामान घेऊन कोण येणार यावरुन दिवसभर भांडण सुरु होतं.
या भांडणानंतर आफताब घराबाहेर गेला आणि गांजाचं सेवन करुन परतला. आपण श्रद्धाची हत्या करणार नव्हतो, पण गांजाचं सेवन केलं असल्याने त्याच्या प्रभावाखाली आपल्या हातून गुन्हा घडला असा दावा त्याने पोलिसांकडे केला आहे.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी श्रद्धाची रात्री ९ ते १० दरम्यान गळा दाबून हत्या करण्यात आली. यानंतर आफताब रात्रभर मृतदेहाशेजारी बसून होता. यावेळी तो गांजाने भरलेली सिगारेट ओढत होता.
आफताबने बाथरुमच्या आतमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. आफताबने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रक्त वाहून जावं यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करताना नळ सुरु ठेवला होता. पाण्याचं बिल जास्त असल्याने पोलिसांना संशय आला होता. आता हेच बिल या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरणार आहे. तसंच फॉरेन्सिकला किचनमध्ये रक्ताचे डाग आढळले आहेत.
हत्या केल्यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी त्याने ३०० लीटरचा एक फ्रीज खरेदी केला. नंतर रोज रात्री घराबाहेर पडत त्याने वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकून देत विल्हेवाट लावली.
याशिवाय मेहरुलीच्या नाल्यात काही हाडं सापडली असून ही श्रद्धाची असावीत असा त्यांचा अंदाज आहे. आफतबाने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची ठिकाणं सांगितल्यानंतर ही हाडं सापडली आहेत. जर श्रद्धाचा डीएनए या हाडांशी जुळला तर पोलिसांकडे मोठा पुरावा असेल.
दिल्ली कोर्टाने आफताबला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याशिवाय पोलिसांना नार्को-चाचणी करण्यासही परवानगीही दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस आफताबला घेऊन हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडलाही जाणार आहे. आफताब आणि श्रद्धा फिरण्यासाठी गेलेल्या ठिकाणांची पोलीस पाहणी करणार आहेत. चौकशीदरम्यान, आफताबने आपण देहरादूनमध्येही मृतदेहाचे काही तुकडे फेकल्याचं सांगितलं होतं.
पोलिसांच्या हाती काही पुरावे अद्यापही लागलेले नाहीत. यामध्ये आफताबने वापरलेला चाकू, श्रद्धाचं डोकं किंवा ओळख सिद्ध करणारा शरिराचा इतर भाग, तिने त्यादिवशी घातलेले कपडे आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे. आफताबने मोबाईल दिल्ली किंवा मुंबईत फेकून दिला असल्याचा संशय आहे.
शहर
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
- मान्सूनची पाऊले वेगवान! गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी; मुंबईसह उपनगरांत पावसाची दमदार हजेरी!
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
महाराष्ट्र
- बारावी निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे महत्त्वाचे निर्देश; गुणपत्रिकेवर फोटोबाबत नियमावली जारी!
- अमरावतीत औद्योगिक प्रदूषणाचा मोठा स्फोट! नांदगावपेठच्या जमिनीत सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड घातक पातळीवर; निरी (NEERI) च्या अहवालानंतर भूसंपादनाचे आदेश!
- मुंबई-गोवा महामार्ग: ३१ मे ची डेडलाईन उलटूनही काम अपूर्णच; प्रवाशांची गैरसोय कायम!
- सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! कच्च्या तेलाच्या दरात ७ टक्क्यांची प्रचंड उसळी; महाराष्ट्र व देशभरात पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर!
गुन्हा
- पुणे नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: तीन लहान मुलांची न्यायालयात महत्त्वाची साक्ष; आरोपीच्या कृत्याचा केला पर्दाफाश
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य

























Subscribe to my channel




