Covid-19 Variant : चीनमध्ये धुमाकूळ घालणारा व्हेरिएंट महाराष्ट्रात दाखल, पहिल्यांदाच आढळले ३ रुग्ण

परदेशातून मुंबईमध्ये परतलेले तीन जण कोरोनाबाधित आढळले आहेत. या तिघांमध्येही कोरोनाचा BF.7 हा व्हेरिएंट आढळून आला आहे. चीनमधल्या कोरोनाच्या नव्या लाटेला कारणीभूत ठरलेला हा व्हेरिएंट महाराष्ट्रात पहिल्यांदाच आढळून आला आहे.

या तीन बाधित प्रवाशांपैकी दोघे चीनमधून मुंबईत परतले होते तर एक व्यक्ती कॅनडामधून आला होता. या तिघांचेही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. तिघांचीही प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची अद्याप गरज पडलेली नाही.या तिन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसत असून या तिघांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याचं एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं.

आत्तापर्यंत मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या २३ जणांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. ज्यामध्ये पाच मुंबईतले आहेत, ४ गुजरातमधले, ३ पुण्यातले, २ केरळमधले तर उरलेले प्रत्येकी एक रुग्ण नवी मुंबई, अमरावती, सांगली, गोवा, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिशा आणि तेलंगणामधले आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विमानतळावर आरटीपीसीआर चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळलेले सगळे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचे आदेश केंद्राने प्रत्येक राज्याला दिले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply