
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार शिक्षण पद्धतीत होणाऱ्या बदलांची अंमलबजावणी करतानाच आता उच्च शिक्षण संस्थांना शिक्षण संकुलाच्या आवारात उद्यान विकसित करावे लागणार आहे. त्याबाबतचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना दिले.
यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विविध योजना आणि धोरणाच्या माध्यमातून केंद्र सरकार देशभरात वृक्षारोपणाला प्राधान्य देत आहे. राष्ट्रीय वन धोरणासह केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाच्या नगर वन योजनेद्वारे देशाचे हरित उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न आहे. शहरी भागात हरित जागा निर्माण करणे, शहरातील वन जमिनींचा अतिक्रमणापासून बचाव करणे हा योजनेचा उद्देश आहे. स्थानिक रहिवासी आणि विविध संस्थांनी मिळून शहरात जंगलातील जैवविविधता आणि पर्यावरण विकसित करण्याच्या दृष्टीने योजनेचे नियोजन करण्यात आल्याचे यूजीसीच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत मंत्रालयाने एक हजार उद्याने विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २९ राज्ये, केंद्र शासित प्रदेशांमध्ये उद्याने विकसित करण्यास मान्यता दिली आहे. ही योजना नॅशनल ऑथोरिटी ऑफ कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्ट्रेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग ऑथोरिटी (सीएएमपीए) यांच्याकडून मिळणाऱ्या निधीच्या सहाय्याने राबवली जात आहे. या योजनेचा परिघ वाढवण्यासाठी महापालिकांच्या दहा किलोमीटरच्या हद्दीत उद्याने विकसित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण संस्थांनी त्यांच्या शिक्षण संकुलात राज्याच्या वन विभागाच्या सहाय्याने उद्यान विकसित करावे. त्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाकडून आवश्यकत ते सहकार्य करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




