Chakan Crime : खेड तालुक्यात हातभट्टीच्या दारूचा मोठा बेकायदा व्यवसाय; लाखो लिटर दारूची बेकायदा विक्री

चाकण - खेड तालुक्यातील खेड, राजगुरूनगर, चाकण, महाळुंगे तसेच आळंदी या पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा हातभट्टी दारू गाळून तिची बेकायदा विक्री केली जाते. काही हातभट्टी अड्ड्यांवरही पोलिस कारवाई करतात. रसायन व इतर साहित्य उध्वस्त करतात. परंतु पुन्हा ते अड्डे चालू होतात आणि हातभट्टी ची लाखो लिटर दारू खेड तालुक्यातच नव्हे तर पिंपरी -चिंचवड, भोसरी अगदी पुणे परिसरात ही विक्रीसाठी जाते. हे वास्तव आहे. खेड तालुक्यातील हातभट्टी चे दारू अड्डे उध्वस्त झाले पाहिजेत अशी मागणी नागरिकांची आहे.

खेड तालुक्यात औद्योगिक दृष्ट्या आर्थिक विकास झाल्याने अवैध धंद्यातून 'इझी मनी' तत्काळ मिळतो. यामुळे अवैध धंदे करण्याकडे काही गुन्हेगार व इतर लोकांचा कल दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याला काही राजकीय नेत्यांचा, काही कार्यकर्त्यांचा आशीर्वाद ही आहे असे म्हंटले जाते. त्यामुळे हातभट्टी सहित इतर प्रकारच्या अवैध धंद्यांचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येतो आहे.

"मला दोघांसोबतही रहायचंय..."; विवाहबाह्य संबंध उघड होताच महिला थेट विजेच्या खांबावर चढली, नेमकं काय घडलं?

खेड तालुक्यातील खेड, चाकण, महाळुंगे, आळंदी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत भीमा, भामा, इंद्रायणी या नद्याच्या काठावर झाडीत, ओढ्यात मोई, कोयाळी, शेलपिंपळगाव, काळुस, रोहकल, चाकण, वाकी व पश्चिम डोंगराळ भागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा हातभट्टी दारू गाळली जाते. लाखो लिटर दारू बनविण्यासाठी रसायन रापत ठेवले जाते.

त्या रसायनात अगदी काही विषारी घटक मिसळवून दारुसाठी रसायन करतात. कडक दारू बनली पाहिजे यासाठी घातक पदार्थ त्यात मिसळविले जातात. त्यामुळे मानवी आरोग्याला त्याचा मोठा धोका होतो. त्या हातभट्टी अड्ड्यांवरही पोलिस ठोस कारवाई करून ते नष्ट करतात परंतु त्या गावठी दारूच्या हातभट्टी पुन्हा सराईतपणे उभ्या राहतात व लाखो लिटर दारू गाळून त्याची विक्री सराईतपणे केली जाते हे भयानक वास्तव आहे.

हा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना मात्र भेडसावतो आहे.पोलिसांनी गांभीर्याने घेतले तर अवैध धंदे बंद करणे काहीच अवघड नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. या दारूअड्ड्यांमुळे व मद्यपीमुळे रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना विशेषत: महिला व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे.गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर पोलिस तसेच उत्पादन शुल्क विभागांने वारंवार कारवाई केली पाहिजे.

खेड तालुक्याच्या महत्वाच्या शहरात तसेच औद्योगिक वसाहतीत ग्रामीण भागात प्रमुख गावांमध्ये बेकायदा देशी, विदेशी दारू विकणाऱ्या लोकांचा सुळसुळाट झाला आहे. या दारू विक्रेत्यांमुळे काही ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ, महिला त्रस्त झाले आहेत. पण दाद कोणाकडे मागणार, धंदे काही गुन्हेगार आदी लोंकाचे असल्याने नागरिकांची अवस्था मात्र गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही अशी आहे.

गावठी दारू काढणाऱ्या हातभट्टीवर पोलीस कारवाई करत आहेत. आरोपीवर गुन्हा दाखल करताना पहिल्यांदाच कलम 328,34 लावण्यात आले आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (फ )प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. कलम 328 लावल्याने आरोपीला या गुन्ह्यात जामीन मिळत नाही. त्यामुळे बेकायदा गावठी दारूच्या हातभट्टी काढण्यावर मोठया प्रमाणात प्रतिबंध येणार आहे. चाकण परिसरात गावठी दारूच्या हातभट्ट्या उध्वस्त करण्याकडे तसेच अवैध धंदे बंद करण्याकडे पोलिसांचा अधिक कल आहे. असे चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.

नाणेकरवाडी गावच्या हद्दीत एका घरात घरमालकीण असलेल्या एका महिलेकडे तीस हजार रुपयाची गावठी दारू प्लस्टिकच्या पिशव्यातून विक्री करण्यात येणारी मिळाली.त्या दारूचा जागेवर नाश करण्यात आला.रासायनिक तपासणी साठी नमुने काढण्यात आले. ही कारवाई चाकण पोलिसांनी ता. 3 ला केली. असे चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.

प्लास्टिकच्या लहान पिशव्यात ही दारू भरून त्याला फुगा असे संबोधले जाते. ती सराईत पणे बेकायदा मजूर व इतर लोकांना विकली जाते. ही दारू स्वस्तात मिळते,त्यामुळे अनेक लोक या दारूच्या आहारी पडतात. त्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येत आहे हा गंभीर प्रश्न आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply