Mumbai : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीपासून वेगळा आहे. महायुतीत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत सातत्याने बैठका होताना दिसत आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, महायुतीत जागावाटपाबाबत जवळपास बऱ्याच जागांवर दोन्ही पक्षांचं एकमत झालेलं आहे. केवळ 20 जागांवर आता पेच असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत भाजप आणि शिंदे गटात 207 जागांवर एकमत झालं आहे. पण तरीदेखील 20 जागांवर पेच कायम आहे. आतापर्यंत ठरलेल्या जागावाटपानुसार भाजपच्या वाटेला निवडणूक लढण्यासाठी 128 जागा आणि शिवसेना शिंदे गटाला 79 जागा देण्याबाबत एकमत झाल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी महायुतीच्या बैठकांनंतर याबाबत महत्त्वाची माहिती देखील दिली आहे.
|
|
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. "भाजप 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवर आमचं एकमत झालेलं आहे. उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरु आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन लवकरच उरलेल्या 20 जागांचा तोडगाही काढण्यात येईल", अशी माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिली.
शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. "भाजप 128 आणि शिवसेना 79 अशा जागांवर आमची सहमती झाली आहे. तर उरलेल्या 20 जागांवर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील", अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेआणि मनसे अध्यक्षराज ठाकरे यांची आता युती झाली आहे. दोन्ही नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. पण अजूनही दोन्ही नेत्यांकडून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. दोन्ही नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षदेखील एकत्र निवडणूक लढवू शकतो अशी शक्यता आहे. पण जागावाटपावर जाहीर झाल्यानंतरच याबाबत उलगडा होण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत याबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel