
Barsu Refinery Project Latest Update : बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासशेकडाे ग्रामस्थांनी विराेध र्शविला आहे. आज (साेमवार) सकाळपासून बारसू प्रकल्प ज्या ठिकाणी हाेऊ घातला आहे. तिथंपर्यंत शेकडाे ग्रामस्थांनी लाॅंग मार्च काढत प्रकल्पास तीव्र विराेध दर्शविला आहे. दरम्यान या आंदाेलनात दाेन महिलांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
बारसू माळरानावर सध्या ग्रामस्थांनी रिफायनरीच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. रिफायनरी विरोधातील आंदोलनातील एका महिलेला दुपारी 12 च्या सुमारास उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर आजूबाजूच्या महिलांनी आणि ग्रामस्थांनी महिलेला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने रुग्णालयात जाण्यास दिला नकार दिला.जीव गेला तरी चालेल पण रुग्णालयात जाणार नाही अशी महिलेने ठाम भूमिका घेतली.
दरम्यान दुपारी दाेन वाजता काही महिलांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना सावलीत नेण्यात आले. या आंदाेलनात सहभागी झालेल्या वनिता गुरव या महिलेला उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. तिला तात्काळ महिलांनी वार घातलं. त्यानंतर एका वाहनातून रुग्णालयात हलवले. यावेळी वनिता देखील आंदाेलनस्थळीच थांबण्यासाठी हट्ट धरत असल्याचे दिसून आले.
रिफायनरीचा प्रकल्प रेटला जाताेय : खासदार विनायक राऊत
खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरीचा अट्टहास धरणा-या शिंदे- फडणवीस सरकारवर टीकास्त्र साेडले. सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी बाेलताना खासदार विनायक राऊत म्हणाले रिफायनरीचा ध्यास घेतलेल्या या राज्यकर्त्यांनी पोलीसी यंत्रणेचा दुरूपयोग करून लोकांची डोकी फुटली तरी चालतील; पण रिफायनरीचा प्रकल्प पुढे रेटायचा अशा पद्धतीने त्यांनी कामाला सुरूवात केली आहे.
उद्धव ठाकरे ग्रामस्थांना भेटणार
राऊत म्हणाले आज त्याठिकाणच्या आंदाेलनात चार हजाराच्या वर महिला तिथे जमा झाल्या आहेत. फार मोठ्या प्रमाणात पोलीसी अतिरेक केला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी याची गंभीररित्या दखल घेतली असून ते उद्याच या पोलिसी अतिरेकीपणाच्या विरीधात आपली भूमिका मांडणार आहेत. आणि जर गरज पडली तर आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत अशी भूमिका प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी व्यक्त केली.
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




