Ashadi Wari 2023 : सोपानकाकांच्या नगरीत वैष्णवांची मांदियाळी; ज्ञानेश्‍वर माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

सासवड : पुरंदर पंचक्रोशीतील भाविकांनी ज्ञानेश्‍वर माऊलींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभर कडक ऊन असतानाही भाविकांची रीघ कमी झाली नाही. सोपानदेव महाराजांच्या नगरीत माऊलींच्या सोहळ्यासमवेत आलेल्या भाविकांनी दिवसभर विश्रांती घेणेच पसंत केले. वैष्णवांच्या गर्दीने कऱ्हा नदीचा तीर भरून गेला होता. उद्या सकाळी सात वाजता सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ होईल.

आज पहाटे माऊलींच्या चांदीच्या पादुकांवर, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते विधिपूर्वक रुद्राभिषेक करण्यात आला. माऊलींचा मुक्काम दोन दिवसांसाठी असल्याने सासवडवासीयांचा उत्साह मोठा होता. पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी होती. सासवडचा पालखी तळ विस्तीर्ण आणि गावठाण भागात असल्याने शहराला जत्रेचे स्वरूप आले आहे. बुधवारी एकादशीचा उपवास आणि दिवसभर वाटचाल असल्याने वारकऱ्यांची पावले थकली होती. गुरुवारी रात्री वारकऱ्यांनी विश्रांती घेणेच पसंत केले होते.

आज सकाळपासून तळावर द्वादशीचे पारणे फेडण्याची तयारी करत होते. सासवडवासीयांनी पुरणपोळ्या,मिष्टिन्नाची मेजवानी वारकऱ्यांसाठी ठेवली होती. दिंडीकरी व फडकरी हे जिलेबी, पुरणपोळ्या आणि बालुशाही यांचा नैवेद्य माऊलींसाठी आणत होते. दरम्यान ठिकठिकाणी पालखी तळाच्याभोवती खेळण्यांची दुकाने सजली होती. परभणी जिल्ह्यातील माऊली भक्ताने सोहळ्यातील बैलजोडी सजविण्यासाठी साहित्य दिले.

दिवसभरात...

  • सासवड पंचक्रोशीत दिंड्यांचा निवास

  • अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते तळावरील वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा दिल्या

  • काही स्वयंसेवक वारकऱ्यांच्या पायांना मालिश करून देते होते

  • तळावर भजन , कीर्तन, हरिपाठ सुरू होते



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply