
मुंबई : भाजपच्या माघारीनंतर एकतर्फी झालेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाचे नवीन नाव, मशाल चिन्हावर विजय संपादन केल्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेला बळ प्राप्त झाले आहे.
भाजपच्या माघारीनंतर अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक एकतर्फी होईल, हे स्पष्ट होते. तरीही शिवसेनेने सारी ताकद पणाला लावली होती. मतदारांमधील निरुत्साहामुळेच अवघे ३२ टक्के मतदान झाले होते. शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांना ६६,५३० मते मिळाली, तर अन्य सहा अपक्षांना दीड हजारांच्या आतच मते पडली. ‘नोटा’चा पर्याय १२,८०६ मतदारांनी स्वीकारला. लातूर ग्रामीणनंतर राज्यात अंधेरी पूर्वमध्ये ‘नोटा’चे बटण जास्त मतदारांनी पसंत केले आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या या पहिल्याच पोटनिवडणुकीत शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी जाहीर करून प्रचारही सुरू केला होता. शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह मिळू नये म्हणून एकनाथ शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. सर्वाधिक खासदार व आमदारांचा शिंदे यांना पाठिंबा असल्याने निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव वापरण्यास ठाकरे गटाला मज्जाव केला तसेच धनुष्यबाण चिन्ह गोठवले होते. ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव तसेच मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाने बहाल केले होते. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल- तलवार चिन्ह दिले होते.
दरम्यान, ऋतुजा लटके यांच्या उमेदवारी अर्जाचा घोळ घालण्यात आला. त्यांचा मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतील राजीनामा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत स्वीकारण्यास महापालिका प्रशासनाने नकारघंटा वाजविली होती. या विरोधात लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने राजीनामा स्वीकारण्याचा आदेश दिल्याने भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गटाची पंचाईत झाली. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात शिवसेनेच्या ठाकरे गटाला यश मिळेल, असेच निष्कर्ष प्राप्त झाले होते. भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली असती व पराभव झाला असता तर त्याचा फटका आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बसण्याची भीती भाजपला होती. यामुळेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्राच्या आधारे भाजपने माघार घेत असल्याचे जाहीर करीत निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडणे पसंत केले.
महाविकास आघाडीचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादीसह डावे व अन्य समविचारी पक्ष या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकांना एकत्रित सामोरे गेल्यास फायदा होतो, हे देगलूर, कोल्हापूर उत्तर मतदारसंघांतील पोटनिवडणूक किंवा पुणे व नागपूर पदवीधर मतदारसंघांतील निकालांवरून यापूर्वीच सिद्ध झाले होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढल्यास ते भाजप आणि शिंदे गटासाठी मोठे आव्हान असेल.
अंधेरीच्या यशाचा फायदा किती?
पोटनिवडणुकीतील यशाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाला बळ प्राप्त झाले आहे. फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीतील यशाने पक्षासाठी योग्य संदेश गेला आहे. पराभव झाला असता तर शिवसेना संपली, असा प्रचार सुरू झाला असता. अंधेरीच्या निकालाचा महानगरपालिका निवडणुकीत थेट परिणाम होणार नसला तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बळ प्राप्त झाले आहे. तसेच फुटीनंतरही शिवसैनिकांना जिंकू शकतो, असा विश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे. अंधेरीच्या निकालाचा मुंबईत महापलिका निवडणुकीवर तेवढा प्रभाव पडणार नसला तरी शिवसेना व उद्धव ठाकरे यांना हा निकाल उपयुक्त ठरणारा आहे. कार्यकर्त्यांना नैतिक बळ देण्यात अंधेरीचा निकाल पक्षाला उपयोगी पडू शकतो.
‘नोटा’ दुसऱ्या क्रमांकावर
पोटनिवडणुकीत मतदारांमध्ये कमालाची निरुत्साह होता. भाजपच्या माघारीनंतर चित्रच पालटले होते. शिवसेना वगळता सहा जण रिंगणात होते. पण, त्यातील कोणीच फारसे प्रभावशाली नव्हते. ‘नोटा’चा वापर करावा, असे आवाहन केले जात असल्याचा आरोप शिवसेनेचे अनिल परब यांनी भाजपवर केला होता. लटके यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची १२,८०६ मते ‘नोटा’ला मिळाली आहेत.
निकाल
- ऋतुजा लटके – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ६६,५३०
- नोटा – १२,८०६ मते
- अन्य सहा उमेदवारांना दीड हजारांच्या आतच मते
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

