
मुंबई : सहा राज्यांमधील सात विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये चार जागा जिंकून भाजपने आपले वर्चस्व कायम राखले. गतवेळच्या तुलनेत भाजपला एका जागा अधिक मिळाली, तर काँग्रेसला दोन जागा गमवाव्या लागल्या. शिवसेना तेलंगण राष्ट्र समिती आणि राष्ट्रीय जनता दल या प्रादेशिक पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाली.
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, ओदिशा, तेलंगण, हरयाणा या सहा राज्यांमधील सात मतदारसंघांत पोटनिवडणुकांसाठी ३ नोव्हेंबरला मतदान झाले. महाराष्ट्र आणि बिहारमध्ये सत्तांतरानंतर पोटनिवडणुका होत असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले होते. सातपैकी सर्वाधिक चार जागा भाजपने जिंकल्या. उर्वरित तीन जागांमध्ये प्रत्येकी एक जागा शिवसेना, तेलंगण राष्ट्र समिती आणि राष्ट्रीय जनता दलाला मिळाली. पोटनिवडणुकांपूर्वी भाजप तीन, काँग्रेस दोन, शिवसेना आणि राष्ट्रीय जनता दलाकडे प्रत्येकी एक जागा होती. भाजपने तीन जागा कायम राखल्याच, पण त्याबरोबरच हरयाणामधील एक अतिरिक्त जागा जिंकली. काँग्रेसला तेलंगण आणि हरयाणामधील दोन्ही जागा गमावल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रीय जनता दलाने आपल्या जागा कायम राखल्या आहेत.
महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये अलीकडे सत्तांतर झाले. म्हणजेच मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच दोन मतदारसंघांत पोटनिवडणूक झाली. भाजप आणि राष्ट्रीय जनता दलाने आपल्या जागा कायम राखल्या. बिहारमधील गोपाळगंज मतदारसंघातील जागा भाजपने दोन हजारांच्या मताधिक्याने जिंकली. एमआयएमच्या उमेदवाला मिळालेली १२ हजार तर बसपला मिळालेली ८ हजार मते भाजपच्या पथ्थ्यावर पडली. दुसऱ्या मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाने १६ हजार मतांनी विजय प्राप्त केला. भाजपचे मताधिक्य कमी झाले असले तरी जागा कायम राखण्यात यश मिळाले. तेलंगणातील पोटनिवडणूक कमालीची चुरशीची झाली. काँग्रेस आमदाराने राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्या दोन वर्षांत झालेल्या दोन मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपने विजय प्राप्त केला होता. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना राजकीय शह देण्याची भाजपची योजना होती. परंतु, पोटनिवडणुकीत तेलंगण राष्ट्र समितीने ही जागा १० हजारांहून अधिक मतांनी जिंकली. काँग्रेस उमेदवाराला २५ हजारांच्या आसपास मते मिळाली. तेलगंणातील ही पोटनिवडणूक मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासह भाजप आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. तेलंगण राष्ट्र समितीला विजय मिळाल्याने पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला राजकीय फायदा होणार आहे. हरयाणात माजी मुख्यमंत्री भजनलाल यांच्या पुत्राने काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पोटनिवडणुकीत भजनलाल यांच्या नातवाने भाजपच्या वतीने विजय प्राप्त केला. काँग्रेसला ही जागाही गमवावी लागली. उत्तर प्रदेश व ओदिशात भाजपने जागा कायम राखल्या आहेत.
काँग्रेसला फटका
मल्लिकार्जुन खरगे यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यावर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. तेलंगण व हरयाणातील जागा पक्षाला कायम राखता आलेल्या नाहीत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये पक्षाचे उमेदवारच रिंगणात नव्हते. हरयाणा आणि तेलंगणातील जागा पक्षाच्या आमदारांच्या राजीनाम्यानंतर पक्षाला गमवाव्या लागल्या.
सहा जण घरातलेच..
सातपैकी सहा मतदारसंघांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या घरातील सदस्य पोटनिवडणुकीत निवडून आले आहेत. त्यास फक्त तेलंगणाचा अपवाद ठरला. उत्तर प्रदेश, हरयाणा आणि ओदिशात लोकप्रतिनिधींची मुले, तर महाराष्ट्र, बिहारमधील दोन्ही जागांवर त्यांच्या पत्नी विजयी झाल्या आहेत.
निकाल असा..
- महाराष्ट्र – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- बिहार जागा २ – भाजप आणि राष्ट्रीय जनता दल
- उत्तर प्रदेश – भाजप
- ओदिशा – भाजप
- तेलंगण – तेलंगण राष्ट्र समिती
- हरयाणा – भाजप
शहर
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
महाराष्ट्र
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
गुन्हा
- धक्कादायक! स्वतःला 'RAW' अधिकारी सांगून तरुणीशी थाटला संसार; लग्नानंतर सत्य समोर येताच पायाखालची जमीन सरकली!
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य






















Subscribe to my channel




