महाराष्ट्र: भारतीय चित्रपट सृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान, परखड आणि अष्टपैलू अभिनेते तसेच सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वात आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातून शोकसंवेदना व्यक्त होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर (एक्स - X) पोस्ट करत नाना पाटेकर यांना अत्यंत भावूक शब्दांत आदरांजली वाहिल आहे.
शरद पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, "ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीने एक असाधारण अभिनेता आणि परखड व्यक्तिमत्त्व गमावले आहे. आपल्या सशक्त अभिनयाने आणि अफाट लोकमान्यतेने त्यांनी दशकानुदशक चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. पडद्यावर अत्यंत ताकदीने भूमिका साकारण्यासोबतच, खऱ्या आयुष्यातही त्यांनी कधीही अन्यायासमोर मान झुकवली नाही आणि नेहमी समाजहिताच्या मुद्द्यांवर आपली ठाम भूमिका मांडली."
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, "नाना पाटेकर हे केवळ एक उत्तम अभिनेते नव्हते, तर ते एक अत्यंत संवेदनशील आणि कृतिशील नेते होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी 'नाम फाउंडेशन' सारख्या संस्थेची स्थापना करून जे सामाजिक कार्य उभे केले, ते संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी नेहमीच सक्रिय सहभाग घेतला आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या जाण्याने समाजाने एक सच्चे सामाजिक भान असलेले व उत्तरदायित्व जपणारे महान व्यक्तिमत्त्व गमावले आहे."
चित्रपटांमधील त्यांचे गाजलेले संवाद, त्यांची साधी जीवनशैली आणि प्रत्येक भूमिकेत जीव ओतण्याची त्यांची हातोटी यामुळे ते कोट्यवधी रसिकांच्या मनावर राज्य करत होते. त्यांच्या या अकाली निधनाने केवळ मनोरंजक क्षेत्रच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शरद पवार यांनी नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहसंवेदना व्यक्त करत त्यांना या कठीण प्रसंगात ईश्वर शक्ती प्रदान करो, अशी प्रार्थना केली आहे.
शहर
- पुणे: रिंगरोड'ला अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीवरून रोहित पवारांनी राज्य सरकारची केली कोंडी; पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: आधी जीआर, मगच माघार!; सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प
- मुंबई: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दालनाचं उद्घाटन कोण करणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले, सत्ताधाऱ्यांना लगावला टोला
- मुंबई: लोकलमध्ये धक्कादायक थरार! दोन प्रवाशांच्या भांडणात फेकलेला चाकू घुसला तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या छातीत; अंधेरीतील घटना
महाराष्ट्र
- पुणे: भक्तीचा महासागर! प.पू. श्री शंकर महाराजांच्या प्रगटदिन सोहळ्याला उत्साहात सुरुवात, दिवसभर दर्शनासाठी उसळली अलोट गर्दी
- कोल्हापुर: केएसए फुटबॉल लीगचा महासंग्राम १ डिसेंबरपासून सुरू होणार; वेळापत्रक जाहीर, कधी अन् कोणत्या संघात रंगणार सामने?
- पुणे: रिंगरोड'ला अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीवरून रोहित पवारांनी राज्य सरकारची केली कोंडी; पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: आधी जीआर, मगच माघार!; सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना
- नवी दिल्ली: पाठिंब्याबाबत शरद पवार गटाच्या संकेतांमुळे NDAला मिळाले बळ; संसदेत १० ते १५ मते अधिक मिळण्याची शक्यता
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन


























Subscribe to my channel



