28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला येण्यासाठी विमानाने निघाले होते. विमान बारामतीमध्ये धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला. विमान धावपट्टीवर उतरत असताना विमानाचं नियंत्रण सुटलं आणि विमान थेट जमिनिला धडकलं. विमान जमिनिला धडकल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आग लागली. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, याचे आतापर्यंत दोन व्हिडीओ समोर आले आहेत. आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या अपघाताचा दुसरा जो व्हिडीओ होता, त्यामध्ये विमान हवेतच तिरकं झाल्याचं पहायला मिळत होतं, त्यावरून अनेकांनी या अपघाताबद्दल शंका देखील उपस्थित केली होती, दरम्यान आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की अपघात झाल्यानंतर काही वेळातच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. विमान कोसळल्यानंतर स्फोट होऊन काही क्षणातच या विमानाला भीषण आग लागली, मात्र आता आग लागल्यानंतर देखील आणखी एक स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीच्या ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या स्फोटाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. विमानाला आग लागल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार स्फोट झाला, या स्फोटाचा आवाज व्हिडीओमधून स्पष्ट ऐकायला मिळत आहे. या स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले या स्फोटामुळे घटनास्थळी आलेल्या नागरिकांमध्ये देखील भीती निर्माण झाली.
अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता, आता या अपघाताच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. pic.twitter.com/86IGnph1QC
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2026
दरम्यान दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातानंतर हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं, सध्या या अपघाताच तपास विविध यंत्रणांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे या विमान अपघाताचा तपास सुरू असतानाच काही जणांकडून या अपघातावर शंका देखील उपस्थित करण्यात येत आहे.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel