
Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटीस काढली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्ती तयार न करता पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीओपी साहित्याची विल्हेवाट लावावी, तसा साठा आढळून आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल,असा इशारा मनपाने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे.
याबाबत आज अहमदनगर मनपात गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांची मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्यासोबत बैठक झाली. गुजरात न्यायालयाचा निकाल, औरंगाबाद खंडपीठाचा निकाल आणि मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्यावर्षी विधानसभेत पीओपी गणेश मूर्तीला कोणतीही बंदी नाही या केलेल्या निवेदनाचा संदर्भ देत गणेश मूर्तीकारांनी आपले म्हणणे मांडले. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.
|
Voter List : मधून 50 हजार नावं गायब? कल्याण-डोंबिवलीतील जागरूक मतदार हायकोर्टात धाव घेणार |
मनपाच्या निर्णयाविरोधात जनआंदोलन उभारणार
केंद्रीय प्रदूषण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या सूचनेनुसार आम्ही संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत, प्रदूषण मंडळाकडून या सूचना देण्यात आल्यात त्याचे सर्व कारखानदारांनी पालन करावे असं आयुक्त पंकज जावळे यांनी म्हटले आहे. तर मनपाच्या या निर्णयाविरोधात लवकरच जनआंदोलन उभा केलं जाईल, अशी भूमिका गणेश मूर्तीकारांनी घेतली आहे.
कारखानदारांनी सूचनांचे पालन करावे - मनपा आयुक्त पंकज जावळे
याबाबत मनपा आयुक्त पंकज जावळे म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात, अशा सूचना दिलेल्या आहेत. यानुसार अहमदनगरमधील सर्व गणेश मूर्ती कारखानदारांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनांबाबत माहिती देण्यासाठी आज बैठक बोलावण्यात आली. माझे सर्वांना आवाहन आहे की, सर्व कारखानदारांनी सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
....तर मूर्तिकारांना आत्महत्या कराव्या लागतील - भरत निंबाळकर
गणेश मूर्तिकार भरत निंबाळकर म्हणाले की, किमान सात साडेसात हजार कारखानदार आणि कारागीर मूर्ती बनवून त्यावर आपल्या उदरनिर्वाह करतात. हा व्यवसाय बंद करण्यात आला तर शेतकऱ्यांसारखी गणेश मूर्तिकारांनाही आत्महत्या कराव्या लागतील. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेत तसेच शेड भाड्याने घेऊन गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे या निर्णयाचा योग्य विचार केला जावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप




























Subscribe to my channel




