Accident News : वाहनाचा दोर तुटला अन् अनर्थ घडला; डीजे जनरेटरची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

Accident News : नांदेडमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. डीजेच्या वाहनाच्या पाठीमागे बांधलेल्या जनरेटरचा दोर तुटल्याने मोठा अपघात झाला. जनरेटर दुचाकीला धडकल्याने एकजण जागीच ठार झाला, तर एकाला गंभीर दुखपात झाली. हिमायतनगर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डीजेचा जनरेटर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला जात होता. वाहनाच्या पाठीमागे दोरीने जनरेटर मशीन बांधण्यात आली होती. दोरी तुटल्याने जनरेटर बाजूने जाणाऱ्या दुचाकीला जाऊन धडकला. जनरेटर अचानक धडकल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.

Sarangkheda Police : दुचाकीवर छुप्या पद्धतीने गांजा तस्करी; सारंगखेडा पोलिसांची कारवाई, एकाला घेतले ताब्यात

योगेश राठोड आणि गोरू राठोड हे दोघेजण हिमायतनगर येथून ईस्लापूरकडे दुचाकीने जात होते. डीजे जनरेटरची मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनाची दोरी तुटली आणि जनरेटर दुचाकीला जोरात धडकला. या अपघातामध्ये योगेश राठोड हा तरुण जागीच ठार झाला. गोरू राठोड हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर हिमायतनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

डीजेच्या वाहनाच्या पाठीमागे जनरेटर मशीन दोरीने बांधली होती. हिमायतनगर ते किनवट या राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना ही दोरी तुटली. त्यामुळे जनरेटर बाजूने जाणाऱ्या दुचाकीला जाऊन आदळला. ही दुर्दैवी घटना अनावधानाने घडली की निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याचा तपास सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply