42-Year-Old Physician Dies After Injecting Anesthesia in Hospital Cabin

नागपूर: डॉक्टरचा हृदयद्रावक अंत! न्यूरॉन्स हॉस्पिटलच्या केबिनमध्ये स्वतःला इंजेक्शन टोचून डॉक्टरांनी संपवले आयुष्य

42-Year-Old Physician Dies After Injecting Anesthesia in Hospital Cabinनागपूर: नागपूरच्या धंतोली परिसरातील प्रसिद्ध 'न्यूरॉन्स हॉस्पिटल'मध्ये कार्यरत असलेल्या ४२ वर्षीय निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याने स्वतःच्याच केबिनमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार (रा. शिवशक्तीनगर, मानेवाडा) असे या मृत डॉक्टरांचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. चांदेवार सोमवारी सकाळी रुग्णालयातील आपले नेहमीचे कामकाज पूर्ण करून विश्रांतीसाठी आपल्या कक्षात (रूम नं. ४०८) गेले होते. बराच वेळ उलटूनही ते बाहेर न आल्याने आणि त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने सहकाऱ्यांना शंका आली. सहकाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, त्यांना डॉ. चांदेवार बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने हॉस्पिटलच्याच अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

इंजेक्शनचा ओव्हरडोस आणि कौटुंबिक तणाव: प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, डॉ. चांदेवार यांनी स्वतःच्या उजव्या हातावर बधिरीकरणाची (Anesthesia) तीन इंजेक्शन्स टोचून घेतली होती. औषधाची मात्रा अति झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही, परंतु पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. डॉ. चांदेवार यांनी प्रेमविवाह केला होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. याच तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पोलीस तपास सुरू:धंतोली पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस अधिक तपास करत असून, आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे. आयुर्वेद शाखेतील शिक्षण पूर्ण करून रुग्णसेवा करणाऱ्या एका डॉक्टरचा अशा प्रकारे झालेला अंत सर्वांनाच चटका लावून जाणारा आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *