
Crime News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत असून, उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने संभाजीनगरात मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने छत्रपती सभाजीनगर शहरातील 14 जणांना नोटीस दिल्या असून, 15 ते 18 जानेवारीदरम्यान लखनौमधील एटीएस मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यात होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात एका संघटनेची सप्टेंबर महिन्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीत जानेवारी महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा पार पडली असल्याचे काही पुरावे मिळाल्याने उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाने ही कारवाई केली आहे.
अधिक माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये जानेवारी महिन्यात होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात एका संघटनेची सप्टेंबर महिन्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीत कार्यक्रमाविरोधात कट रचून मोहीम चालवण्यासंदर्भात चर्चा पार पडली. तर, या बैठकीचे तांत्रिक पुरावे तेलंगणा पोलिसांना मिळाले होते. तर, अयोध्येमधील धार्मिक स्थळांबाबत उल्लेख बैठकीत झाल्याने तेलंगणा पोलिसांनी तत्काळ ते पुरावे उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाकडे पाठवले. बैठकीचे पुरावे मिळताच उत्तर प्रदेश एटीएसने ऑक्टोबरमध्ये गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणी उत्तर प्रदेशचे एटीएस पथक शहरात तपासासाठी आले होते, आणि यावेळी त्यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या शहरातील 14 जणांना नोटीस बजावली आहे.
|
Maratha Reservation : ...तर एवढं काम झालं नसतं; जरांगेंना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं स्पष्ट |
महाराष्ट्र एटीएसने दखल घेतलीच नाही...
जानेवारी महिन्यात देशात पार पडणाऱ्या एका मोठ्या आयोजनाच्या अनुषंगाने काही ठिकाणी त्याविरोधी मोहीम सुरू झाली. या बैठकीला दहशतवादी संघटना इसिसचे समर्थनही करण्यात आल्याचे सुत्रांची माहिती आहे. तपास यंत्रणांमधील सुत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश एटीएसने महाराष्ट्र एटीएसला यासंदर्भाने पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्याची दखलच घेतली गेली नाही. जानेवारी महिन्यातील मोठ्या आयोजनाचे गांभीर्य ओळखून अखेर उत्तर प्रदेश प्रशासनाने लखनौ येथील दहशतवादविरोधी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 153 ए, 153 बी, भादंवि व 13/18 बेकायदेशीर क्रिया (यूएपीए) अधिनियम 1967 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी उत्तर प्रदेश एटीएसचे अधिकारी नुकतेच शहरात येऊन गेले. त्यांनी संशयितांची चौकशी करून नोटीस बजावली आहे.
यापूर्वी अनेकदा कारवाई...
छत्रपती संभाजीनगर शहरात यापूर्वी देखील विघातक कृत्य करण्याच्या हालचालींबद्दल संशय आल्याने एटीएस पथकाकडून अनेकदा कारवाई झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. सोबतच, काही दिवसांपूर्वी पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले होते. अशात आता उत्तर प्रदेश एटीएसने शहरात येऊन कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता स्थानिक एटीएस पथकाकडून यावर काही कारवाई होते का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
महाराष्ट्र
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
- मुंबई: विद्यार्थ्यांना चांगला आहार मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा आदेश; दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी योजना वाढवण्याचे संकेत
- मुंबई: राज ठाकरेंनी आंदोलनात जाऊन रोहित पवारांचे कान टोचले; भाजपचा जोरदार हल्लाबोल
- मुंबई: दुष्काळात रस्ते धुण्यासाठी मुंबई महापालिका ८ कोटी खर्च करणार; स्थायी समितीच्या बैठकीत वादंग
गुन्हा
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: हरदीप सिंह पुरी, बी. एल. वर्मांसह ८ विद्यमानांना डच्चू; राज्यसभेच्या ८ जागांवर भाजपाचा 'नवा चेहरा'
- उत्तर प्रदेश: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन! पक्षांतर्गत सर्वेक्षणात मोठा गौप्यस्फोट, १०० हून अधिक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!























Subscribe to my channel



