
पुणे : सोमवारी उगवत्या सूर्याच्या साक्षीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करुन ३२१ स्नातकांनी मातृभूमीच्या संरक्षणार्थ रुजू होण्याची शपथ घेतली. यावेळी प्रबोधिनीच्या प्रसिद्ध खेत्रपाल मैदानावर झालेल्या दिमाखदार दीक्षांत संचलनाचे प्रमुख निरीक्षक म्हणून हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी उपस्थिती लावली. यावेळी लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, एनडीएचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल अजय कोचर आणि उपप्रमुख तसेच मुख्य प्रशिक्षक मेजर जनरल संजीव डोगरा उपस्थित होते.
यावेळी बोलताना “राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून ४० वर्षांपूर्वी मी माझे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आज दीक्षांत संचलनाचा प्रमुख निरीक्षक म्हणून उपस्थित राहताना त्यावेळच्या आठवणींनी मनात गर्दी केली आहे. तुम्ही निवडलेली वाट ही रुळलेली वाट नाही, त्यामुळे तुमच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावरच आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबरच युद्धाचे आयामही बदलत आहेत. या बदलत्या स्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहा. हे क्षेत्र तुम्हाला देशसेवेची संधी आणि भरभरुन वैयक्तिक समाधान देईल,” अशा शब्दांत भारताचे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी राष्ट्रीय संरक्षणप्रबोधिनीच्या १४२ व्या तुकडीला शुभेच्छा दिल्या.
एनडीएतील प्रशिक्षणादरम्यान सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्नातकांना एअर चीफ मार्शल चौधरी यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. अभिमन्यू सिंह राठोड याने राष्ट्रपती सुवर्ण पदकावर तर अरविंद चौहान याने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. नितीन शर्मा याला ब्राँझ पदकाने गौरवण्यात आले. सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी माईक स्क्वॉड्रनला चीफ ऑफ स्टाफ बॅनर प्रदान करण्यात आला.
या दीक्षांत समारंभामध्ये बोलताना “राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षणातून तुम्ही मातृभूमीच्या संरक्षणासाठी सज्ज होत आहात. मात्र येथेच तुम्हाला आयुष्यभर जीवाला जीव देणारे मित्र मिळतील. यापुढे तुम्ही तुमच्या स्वत:च्या नावाने कमी आणि १४२ वी तुकडी म्हणून जास्त ओळखले जाल. या प्रवासात तुमच्या बरोबर असलेल्या शिक्षकांबरोबरच तुमच्या पालक आणि कुटुंबियांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो,” असे एअर चीफ मार्शल चौधरी म्हणाले.
दीक्षांत संचलनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एअर चीफ मार्शल चौधरी म्हणाले, “युद्धसामग्री आणि तंत्रज्ञानासाठी भारत रशियावर मोठ्या प्रमाणावर अवलंबुन राहिला आहे. मात्र यापुढे आत्मनिर्भर धोरण अंगिकारल्यानंतर संरक्षण सामग्रीसाठी परावलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न तिन्ही दलांकडून करण्यात येत आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भारतीय कंपन्यांबरोबर काम केले जात आहे. तिन्ही सैन्यदलांनी या कामी पुढाकार घेतला असून कोणती सामग्री आयात करायची आणि कोणती कटाक्षाने स्वदेशी असेल याची यादीही तयार करण्यात आली आहे, असे एअर चीफ मार्शल चौधरी यांनी स्पष्ट केले.
शहर
- नाशिक हादरले! कश्यपी धरणात बुडून गर्भवती महिलेसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू, दोन वर्षांच्या चिमुकलीचे प्राण वाचले.
- गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश! बी.ए.एम.एस. डॉक्टर आणि तोतया 'डॉक्टर' अटकेत; दौंड न्यायालयातून ५ दिवसांची कोठडी
- विकास लवांडे यांना मोठा दिलासा! धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पुणे न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर
- .डिझेल दरवाढीचा भडका: एसटीचा प्रवास महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले दरवाढीचे संकेत!
महाराष्ट्र
- नाशिक हादरले! कश्यपी धरणात बुडून गर्भवती महिलेसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू, दोन वर्षांच्या चिमुकलीचे प्राण वाचले.
- शेतकऱ्यांना मोठा दिलासा! खरीप हंगामासाठी आता कॅनमध्ये मिळणार डिझेल; जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय!
- दैवी शक्ती'चा दावा करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन भोंदूबाबांविरुद्ध गुन्हा!
- विदर्भात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष दाखवून 'पळवून नेले', वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप!
गुन्हा
- दैवी शक्ती'चा दावा करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन भोंदूबाबांविरुद्ध गुन्हा!
- गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश! बी.ए.एम.एस. डॉक्टर आणि तोतया 'डॉक्टर' अटकेत; दौंड न्यायालयातून ५ दिवसांची कोठडी
- अनैतिक संबंधातून थरारक हत्या! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले, JCB ने शेतात गाडला मृतदेह
- बंडू आंदेकर तुरुंगातून हलवतोय सूत्र? पुण्यात रक्तरंजित सूडसत्रानंतर पोलिसांचे थेट कारागृहातील हालचालींवर कडक निर्बंध
राजकीय
- विदर्भात राजकीय भूकंप; काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष दाखवून 'पळवून नेले', वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप!
- 'नवीन नागपूर'च्या विकासाला रॉकेट गती! भूसंपादनाचा धडाका; ७८ एकर जमीन ताब्यात, शेतकऱ्यांना १५० कोटींचे वाटप
- महिला बालविकास विभागात खळबळ! मंत्री अदिती तटकरेंच्या खासगी सचिवावर बदल्यांचे रॅकेट चालवल्याचा आणि महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचा रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप
- महायुतीत महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार! लाल दिव्याच्या गाड्या आणि पदांचे वाटप अंतिम टप्प्यात; लवकरच होणार घोषणा!
इतर
- आजचे राशिभविष्य २७ मे २०२६: गजकेसरी योगाचा या राशींना होणार फायदा, आजचा दिवस कसा असेल?
- आजचे राशिभविष्य २६ मे २०२६: मंगळाच्या राजयोगाने ४ राशींचे होणार मंगल, भाग्य उजळणार आणि धनलाभ मिळणार!
- अमरावतीत उन्हाचा हाहाकार! पारा थेट ४७ अंशांवर पोहोचल्याने २ दिवसांत ३ जणांचा उष्माघाताने मृत्यू; प्रशासनाचा रेड अलर्ट
- शेतकऱ्याच्या घामाची क्रूर चेष्टा! बीडमध्ये कांदा विकून हाती काहीच नाही, उलट वाहतूक भाड्यासाठी खिशातूनच द्यावे लागले ३०१ रुपये; बळिराजाच्या डोळ्यांत पाणी
मनोरंजन
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- 'दुनियादारी'च्या यशानंतर मी हवेत होतो अन् तो माज..."; 'प्यारवाली लव्हस्टोरी' फ्लॉप झाल्याची संजय जाधवांनी सांगितली कटू आठवण
- दार उघड बये' हाक पुन्हा घुमणार! लाडके आदेश बांदेकर 'होम मिनिस्टर'च्या नव्या सीझनसह छोट्या पडद्यावर परतणार?
- आयपीएल २०२६ मध्ये युवा वादळ! 'ऑरेंज कॅप'धारक वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी टीनेजर फलंदाज!
देश विदेश
- एकाच कंपनीने घडवला चमत्कार! 'AI' च्या लाटेवर स्वार होत तैवानने भारतीय शेअर बाजाराला टाकले मागे
- युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; होर्मुज सामुद्रधुनीजवळ उडवल्या इराणी नौका!
- खिलाडी अक्षय कुमारचे मोठे पाऊल! काश्मीरमधील सरकारी शाळेच्या उभारणीसाठी दिली तब्बल १ कोटी रुपयांची देणगी
- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मोठे विधान: २०४७ पर्यंत भारत बनणार जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र निर्यातदार देश!






















Subscribe to my channel


