बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे दर रविवारी बंगल्याबाहेरील चाहत्यांची भेट घेतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास बंगल्याबाहेर प्रतीक्षा करतात. चाहत्यांच्या भेटीसाठी बिग बीसुद्धा तितकेच आतुर असतात. त्यामुळे कधी काही कारणास्तव जर ते चाहत्यांची भेट घेऊ शकले नाहीत, तर सोशल मीडियावर पोस्ट लिहून दिलगिरी व्यक्त करतात. सध्या सोशल मीडियावर बिग बी यांचा त्यांच्या बंगल्याबाहेर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कधीकधी त्यांच्या आजूबाजूचे लोकसुद्धा कॅमेरात कैद होतात, तर कधी चाहत्यांच्या हरकती चर्चेचा विषय ठरतात. यावेळीही असंच काहीसं झालं आहे. परंतु कारण वेगळं होतं. यावेळी बिग बींच्या हातातल्या एका पोस्टरने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं होतं. या पोस्टरवरील मजकूर वाचून नेटकरी पेचात पडले.
पापाराझी अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये बिग बी यांच्या हातात एक पोस्टर पहायला मिळतोय. या पोस्टरवर लिहिलं होतं, ‘मला साथ द्या.. माझ्या सासरकडचे माझ्या पत्नीला पाठवत नाहीयेत. 1992 अ लव्ह मॅरेज.’ हा पोस्टर पाहून सर्वजण अवाक् झाले आहेत. नेमकी काय भानगड आहे आणि बिग बींना नेमकं काय सांगायचं आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. परंतु या पोस्टरचं सत्य वेगळंच आहे. या पोस्टरचा अमिताभ बच्चन यांच्याही काहीच संबंध नाही. हा एका आगामी चित्रपटाचा प्रमोशनल पोस्टर होता, जो 13 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. बिग बींनी थोडा वेळ हा पोस्टर आपल्या हातात धरला होता आणि त्यानंतर त्यांनी तो टीमकडे परत केला. परंतु याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
कमेंट्समध्ये अनेकांनी जया बच्चन यांचा उल्लेख केला आहे. ‘अशी पत्नी असेल तर सासरीच ठीक आहे’, अशी मस्करी एकाने केली. तर ‘लांब राहणंच उत्तम आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. जया बच्चन या त्यांच्या तापट स्वभावासाठी ओळखल्या जातात. त्या जेव्हा कधी पापाराझींसमोर येतात, तेव्हा त्या चिडलेल्याच दिसून येतात. त्यामुळे या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी जया बच्चन यांचा उल्लेख करत फिरकी घेतली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




