
मुंबई : राज्यात जून ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल ३ हजार ५०१ कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने गुरुवारी केली. त्यानुसार या मदतीचे वाटप तातडीने सुरू करून बाधितांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत.
अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यातही विशेषत: विदर्भ आणि मराठवाडय़ातील १८ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. या जिल्ह्यातील एकूण ३२५ गावांतील १० हजार ८९४.९२ हेक्टर जमीन पुरामुळे खरडून किंवा वाहून गेली तर १२ हजार ७८८ हेक्टर जमिनीचे पुरामुळे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये, बागायत शेतीसाठी २७ हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक शेतीसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टर मदतीची घोषणा करण्यात आली होती. तसेच ही मदत दोनऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे.
ज्यातील नुकसानीचा अहवाल आल्यानंतर मदत आणि पुनर्वसन विभागाने आज एका शासन निर्णयाद्वारे अतिवृष्टीबाधितांसाठी तब्बल तीन हजार ५०१ कोटींच्या मदतीची घोषणा केली.
अशी मिळणार मदत..
शेतकऱ्यांसाठीचा मदतीचा निधी सबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. ही मदत देताना केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या निकषांची पूर्तता करणाऱ्यांनाच द्यावी, तसेच राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे मंडळामध्ये २४ तासांत ६५ मीलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असल्यास आणि मंडळातील गावामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक शेतपिकांचे नुकसान झाले असल्यास मदत द्यावी, तसेच ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
शहर
- पुणे: हडपसर येथील रुग्णालयात बॉम्ब सापडल्याने खळबळ; तपास सुरू
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
महाराष्ट्र
- पवनराजे निंबाळकर हत्याकांड: २० वर्षांच्या कायदेशीर लढाईचा संपूर्ण इतिहास
- पुणे: हडपसर येथील रुग्णालयात बॉम्ब सापडल्याने खळबळ; तपास सुरू
- बुलढाण्यात बापानेच संपवलं मुलीचं आयुष्य! हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; आरोपी पिता आणि मुलाला अटक
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
गुन्हा
- पवनराजे निंबाळकर हत्याकांड: २० वर्षांच्या कायदेशीर लढाईचा संपूर्ण इतिहास
- पुणे: हडपसर येथील रुग्णालयात बॉम्ब सापडल्याने खळबळ; तपास सुरू
- बुलढाण्यात बापानेच संपवलं मुलीचं आयुष्य! हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; आरोपी पिता आणि मुलाला अटक
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
राजकीय
- मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा; तेलंगणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




