माथेफिरूची क्रुरता! पत्नी आणि मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या, घरातच पुरले मृतदेह

मध्य प्रदेशमध्ये एका व्यक्तीने त्याची पत्नी आणि दोन मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे आरोपीने पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह घरातच पुरले. ही घटना मध्य प्रदेशमधील रतलममधील दिदीनगर भागात घडली. ३३ वर्षीय आरोपी रेल्वेत गँगमन म्हणून काम करतो.

या घटनेनंतर पोलिसांनी तपास करून आरोपी आणि त्याचा एक सहकारी यांना अटक केलं आहे. आरोपीच्या घरातून त्याची पत्नी आणि मुलांचे मृतदेह हस्तगत झाले आहेत.हे प्रकरण तेव्हा उघड झालं जेव्हा महिला आणि तिचे मुलं बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली. तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरू केला आणि त्यात पतीनेच पत्नी आणि मुलांची हत्या केल्याचं उघड झालं. व्यक्तिगत कारणांमुळे आरोपीने पत्नी आणि मुलांचा खून केला, अशी माहिती रतलम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी दिली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *