
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढय़ाला पाठबळ देण्याचे काम पुन्हा एकदा कोल्हापूरकरांनी करून दाखवले. महाविकास आघाडीच्या धरणे आंदोलनाने सीमावासीयांनाही ताकद मिळाली. याच वेळी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला आव्हान देत कोंडी करण्याचा प्रयत्नही झाल्याने आंदोलन राजकीय वळणावर येताना दिसले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद गेल्या सहा दशकांहून अधिक काळ सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी नुकताच जत तालुका व सोलापूर जिल्ह्यातील गावे यांवर कर्नाटकचा हक्क असल्याचा दावा केला. त्यावर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. या विरोधात राज्यभर विशेषत: पुणे- बेंगलोर महामार्गालगतच्या भागात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. परिणामी महाराष्ट्र-कर्नाटक राज्याची परिवहन सेवा चार दिवस बंद पडली.
‘मविआ’ एकवटली
राज्यातील विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने सीमाप्रश्न तापत ठेवला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर थेट बेळगावात जाण्याचा इशारा दिला. मुंबईतून सीमाप्रश्नावरून हाक दिली जात असताना सीमालढय़ाचे प्रमुख केंद्र असलेल्या कोल्हापुरातही त्याची प्रतिक्रिया उमटली. राजर्षी शाहू समाधीस्थळी धरणे आंदोलन करण्याचा इरादा महाविकास आघाडीने व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह काँग्रेसचे पाच आमदार, शिवसेनेचे तीन जिल्हाप्रमुख, रिपाइं, डाव्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यांच्यासह बेळगावातील माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाल्याने धरणे आंदोलन उठावशीर झाले.
विशेष म्हणजे सीमाप्रश्नावरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने कोल्हापुरात जमावबंदी आदेश लागू असतानाही ‘मविआ’ने आंदोलन करून दाखवले.
एन. डी. पाटील आणि उभय काँग्रेस
महाविकास आघाडीने आंदोलनाचा घाट घालताना सीमाप्रश्नाला कोल्हापुरातून कायमच पाठबळ दिल्याचा निर्वाळा सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी दिला. याकरिता साक्ष मात्र ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या दिलेल्या सीमालढय़ाची द्यावी लागली. एन. डी. पाटील, शिवसेनेचा ठाकरे गट या आंदोलनात सुरुवातीपासूनच आक्रमक राहिला आहे. तुलनेने काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे नेतृत्व या चळवळीत अभावानेच दिसले आहे. यामुळेच एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सीमालढा अजूनही कोल्हापुरात सुरू असल्याचे सांगणे भाग पडले. धरणे आंदोलनाच्या निमित्ताने का असेना काँग्रेस- राष्ट्रवादीचा सीमाप्रश्नात सक्रिय सहभाग दिसू लागला आहे. अर्थात तो या आंदोलनापुरता न राहता यापुढेही कायम राहील, अशाही अपेक्षा बेळगावातून आलेल्या एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या. यातच सारे काही आले.
मंत्र्यांना आव्हान
धरणे आंदोलनाच्या निमित्ताने राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारची कोंडी करण्याचा राजकीय प्रयत्न झाल्याचे काही लपून राहिले नाही. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांची समन्वयक मंत्रीपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात बेळगावला जाण्याचा इरादा व्यक्त केला होता. पण त्यांनी तो बदलल्याने त्यावरूनही प्रतिक्रिया उमटत राहिल्या. हाच मुद्दा घेऊन राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी ‘चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई हे दोन्ही मंत्री घाबरून गेले आहेत. १९ डिसेंबरला बेळगाव येथे सीमावासीयांनी आयोजित महामेळाव्याला आम्ही उपस्थित राहणार आहोत. धमक असेल तर चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांनी मेळाव्याला उपस्थित राहावे,’ असे आव्हान दिले आहे. बेळगावसह सीमाभागात कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालायला सुरुवात केली आहे. अशा स्फोटक परिस्थितीत उभय समन्वयक मंत्री तेथे जाणे हे एक आव्हान असणार आहे. या मुद्दय़ावरून सीमाप्रश्न समन्वयक मंत्र्यांची कोंडीचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला असताना तो भेदून दोन्ही मंत्री प्रतिआव्हान देणार का पाहणे लक्षवेधी ठरणार आहे.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

