सर्वांच्या आयुष्यात ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार, पात्रतेनुसार नशीब किंवा प्रारब्धानुसार कोणाचे तरी स्नेहबंध-संबंध असतात. परंतु त्यातील आपले आवडते संबंध आपल्या रुचीनुसार, आपल्या भावनांच्या दृष्टीनुसार कायम राहावेत आणि त्यांनी फक्त आपलंच असावं, आपल्याशीच संबंध ठेवावेत किंवा जास्त वेळ आपल्याला द्यावा अशी आपली आंतरिक इच्छा असते. कदाचित याला सुद्धा काही जण प्रेम समजतात. परंतु जग कसे चालायचे हे ठरलेलं आहे. निसर्ग असो अथवा कोणी जगाचा नियंता असो, त्याच्या नियमानुसार कोणत्या क्षणी काय घडणार हे निश्चित आहे. ते घडणं मात्र अटळ असतं. हे घडवणाराच विधाता म्हटलं तरी चालेल. एका अदृश्य शक्तीच्या नियमाने, नियंत्रणाने जग चालत असतं. युनिव्हर्सचा मास्टर प्लॅन जसा असतो त्याप्रमाणे तो चालतो. यातच परस्पर संबंध सुद्धा आले. दोन जीवांचे, पशु-पक्षी प्राण्यांचे, जीवासोबत आजीवांचे सह-अस्तित्व हाही त्याचाच भाग आहे. कुणाचा ऋणानुबंध-संबंध किती दिवसांचा यूनिवर्सच्या मास्टर प्लॅनमध्ये आहे? हे आपल्याला माहिती नसतं. ते समजायचं असतं, उमजायचं असतं, ओळखायचं असतं आणि तशी समज आपण आपल्या मनाला द्यायची असते. मात्र याला मन तयार होत नाही. कारण आपलं मन संबंधात गुंतलेलं असतं. माणूस भावनेला अधिक महत्त्व देतो. कारण त्यात त्याची त्यातच आत्मतुष्टी असते. हा संबंध इतकाच नियतीच्या आराखड्यात आहे ही समज फार कमी वेळा, कमी लोकांना, कमी प्रमाणात येते. बहुतेक वेळा ती उशिराच आलेली असते. तोपर्यंत युनिव्हर्सच्या या मास्टर प्लॅनमध्ये आपण ढवळाढवळ करत त्याचे दुष्परिणाम भोगलेले असतात. म्हणूनच स्वतःच्या इच्छेनुसार ज्याने जितका आपल्याशी संबंध ठेवला तोच युनिव्हर्सचा मास्टर प्लॅन समजावा, नियतीच्या मनातली गोष्ट जाणून घ्यावी. हेच प्रारब्ध आणि हेच नशीब. घडणाऱ्या गोष्टी घडणारच आहेत. काही घटना अटळ आहेत.आपण संयमाने, समजदारीने इष्ट आणि अनिष्ट संयोगात समभावाने, कठीण काळात जबाबदारीने आयुष्य जगायचे असते. घडायचे ते घडणारच असे म्हणून परिश्रम किंवा कष्ट मेहनत सोडायची नसते. जग जगाच्या नियमाने चालते आहे तर आपणही आपल्या नियमानुसार चालावे. सर्व काही घडत असताना, उघड्या डोळ्यांनी पाहत असताना, वेगवेगळे अनुभव येत असताना आपण कसे चालायचे याचा आराखडा आपल्याकडे असावा. घडणाऱ्या घटनांना समजदारीने,नियमबद्ध संघर्षाने तोंड द्यावे. परंतु अखेर ही समज यायलाच हवी की सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही. अशा अवस्थेतच आयुष्यभर चालणे आहे. म्हणूनच आपणही आपल्या जगण्याचे नियम ठरवावेत. कारण जग त्याच्या नियमानुसार चालत आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: मुंबई-ठाण्यातील जुगाऱ्यांचा नाशिकरोड रेल्वे स्थानकात अड्डा; पोलिसांनी वेशांतर करून टाकलेल्या छाप्यात १३ जण जेरबंद
- नाशिक: रामकुंडावर छठपूजेसाठी ऑईल पेंटने नावे लिहिणाऱ्यांना मोठा दणका; नाशिक महापालिकेकडून दंडात्मक कारवाई
- पुणे: दादांच्या अचूक प्रश्नांसमोर वरिष्ठ सनदी अधिकारीही पडायचे निरुत्तर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या कडक शिस्तीचे व कामाच्या अचूकतेचे भरभरून कौतुक
- पुणे: दादा, तुमचा प्रवास अर्धवट राहिला असेल; पण तुमच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही पूर्ण करू; अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी सुनेत्रा पवार भावुक
महाराष्ट्र
- नागपूर: पोलिसांचा मोठा दणका! प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या ७८ चकऱ्या जप्त, एक जण जेरबंद
- नाशिक: मुंबई-ठाण्यातील जुगाऱ्यांचा नाशिकरोड रेल्वे स्थानकात अड्डा; पोलिसांनी वेशांतर करून टाकलेल्या छाप्यात १३ जण जेरबंद
- नाशिक: रामकुंडावर छठपूजेसाठी ऑईल पेंटने नावे लिहिणाऱ्यांना मोठा दणका; नाशिक महापालिकेकडून दंडात्मक कारवाई
- पुणे: दादांच्या अचूक प्रश्नांसमोर वरिष्ठ सनदी अधिकारीही पडायचे निरुत्तर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या कडक शिस्तीचे व कामाच्या अचूकतेचे भरभरून कौतुक
गुन्हा
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
- पुणे: भाऊबीजेच्या दिवशीच नात्याला काळीमा! दिवाळीचा फराळ घेऊन आलेल्या बहिणींना भावाची बेदम मारहाण; बेसबॉल स्टिकने डोक्यावर केले वार
- मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन
- नवी दिल्ली: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाल्या, हे पुस्तक म्हणजे अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे...
- नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; लॉरेंस बिश्नोई गँगच्या नावाने मागितले ७ कोटी रुपये!


























Subscribe to my channel




