दिवाळी म्हटलं की दिव्यांची रोषणाई, मिष्ठान्न आणि स्वादिष्ट नमकीन वस्तू फराळात खाणे, नवीन कपडे घालून परस्परांना भेटणे, वैयक्तिक आनंद आणि स्नेह-मीलन हे अपेक्षित असते. परंतु हल्ली दीपावलीत फटाक्यांचा उत्साह अती प्रमाणात वाढला आहे. परस्परांना भेटण्यापेक्षा कोणी किती रुपयांचे आणि महागडे फटाके उडवले यावरून कोण किती मोठा हे ठरत आहे. हा मोठेपणाच जीवसृष्टी आणि पृथ्वीला मोठ्या प्रमाणावर घातक ठरत आहे. फटाके फोडल्यानंतर हवेत पसरणारा धूर आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. विशेषतः अस्थमाचा त्रास असणारे रुग्ण,लहान मुलं,ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी या काळात अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. दिवाळीचा आनंद साजरा करताना आपल्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे.शक्यतो फटाके टाळावेत किंवा त्यांचा वापर कमी करावा. विशेषतः लहान मुलं,ज्येष्ठ नागरिक आणि अस्थमाच्या रुग्णांना धुरापासून दूर ठेवावे.सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करावा. घातक द्रव्य: फटाक्यांमध्ये पोटॅशियम नायट्रेट, बेरियम, तांबे, ॲल्युमी नियम आणि शिसे यांसारखी धोकादायक रसायने वापरली जातात, जी शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. तांबे : श्वसनमार्गाला त्रास होतो. कॅडमियम : रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करते, ज्यामुळे अशक्तपणा होतो झिंक : उलट्या आणि धुराचा ताप लीड : आपल्या मज्जासंस्थेवर थेट परिणाम होतो मॅग्नेशियम : मॅग्नेशियमच्या धुराने बधिरपणा येतो सोडियम : निसर्गातील अत्यंत प्रतिक्रियाशील घटक हवेच्या संपर्कात असताना भाजणे किंवा जखमा होऊ शकतात. फटाक्यांच्या धुरात सूक्ष्म धूलिकण आणि असलेल्या विविध रासायनिक पदार्थामुळे फुफ्फुसांवर परिणाम होऊ शकतो.डोळ्यांना जळजळ होण्यापासून ते अस्थमाचा अटॅक येण्यापर्यंत वेगवेगळे त्रास जाणवू शकतात. भाजणे किंवा पोळणे: आतषबाजी करताना सर्वच फटाके फोडताना हात,पाय किंवा त्वचा भाजण्याच्या घटना घडतात,तसे प्रत्येक वर्षी ऐकण्यात येते. घातक कणांमुळे अस्थमा: फटाके जळताना हवेत धूर म्हणजेच बारीक धूलिकण आणि विविध वायू मिसळतात. त्यामध्ये PM2.5 आणि PM10 सारखे सूक्ष्म घातक कण श्वासावाटे शरीरात फुफ्फुसांच्या खोल भागापर्यंत पोहोचतात. त्यामुळे श्वसनमार्गाला त्रास होतो. या प्रदूषक कणांमुळे अस्थमा असलेल्या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होऊ होऊन अस्थमाचा अटॅकही येऊ शकतो. दृष्टीदोष : फटाक्यांच्या धुरातील रासायनिक घटकांमुळे डोळ्यांना जळजळ होते, दृष्टीदोष निर्माण होऊन दृष्टीहीनता ही होऊ शकते. बहिरेपणा: फटाक्यांच्या अतिमोठ्या आवाजाने (१४० डेसिबल किंवा त्याहून अधिक) कानाचे पडदे दुखावू शकतात, ज्यामुळे श्रवणशक्ती कमी होणे किंवा कायमचा बहिरेपणा येण्याची भीती असते. ग्लोबल वॉर्मिगचा धोका: फटाक्यांच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साईड आणि इतर हानिकारक वायू मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात, ज्यामुळे वातावरणातील उष्णता वाढते व ग्लोबल वॉर्मिगचा धोका वाढतो आगीचा धोका : फटक्यांच्या ठिणग्या पडून घरांना,दुकानांना किंवा गोदामांना आग लागण्याच्या शेकडो घटना दिवाळीत घडतात. भीती आणि कचरा: फटाक्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,महीला, गर्भवती महिलांना आणि इतर जनावरांमध्ये प्रचंड भीती, धडकी आणि तणाव निर्माण होतो. अनर्थ घडतात. फटाके फोडल्यानंतर उरलेला कचरा म्हणजे कोणीही काळजी घेत नाही आणि त्याचा पर्यावरणावर परिणाम होतो. कर्करोगाचा धोका: फटाके फुटल्यावर आकाशात रंग पसरवण्यासाठी किरणोत्सर्गी आणि विषारी घटकांचा वापर केला जातो, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. हवेतील रासायनिक संयुगांची वाढलेली पातळी मुलांची वाढ मर्यादित करू शकते आणि शरीरातील विषारी पातळी वाढवू शकते. अभ्यासूंना उपद्रव: फटाक्यांच्या आवाजामुळे अभ्यास करणारी मुले, स्वाध्यायी व्यक्ती,मनस्वी ध्यान धारणा करणारे,विविध स्पर्धा परीक्षा देणारे, तसेच लेखक, ग्रंथकर्ता या सर्व प्रकारच्या व्यक्तींना मोठा उपद्रव होतो आणि त्यांच्या उद्देशांमध्ये बाधा उत्पन्न होते. दिव्यांची मालिका प्रज्वलित करून मन उजळवणारा हा सण असतो, मनातील मलिनता, निरुत्साह दूर होऊन उज्वल जीवनाची आशा निर्माण करणारा हा सांस्कृतिक, धार्मिक उत्सव मूळ उद्देशाप्रती किती प्रामाणिक राहिला हा संशोधनाचा विषय बनला आहे.या उलट आज ज्या प्रकारे दिवाळी साजरी होते, त्याने निसर्ग, सृष्टी, पृथ्वी मानव, पक्षी, प्राणी या सर्व जैविक व अजीव घटकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे योग्य असा सृष्टीसाठी हितकारक विचार करण्याची वेळ आता आली आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




