बँक कर्मचाऱ्यांचा वसुलीसाठी तगादा, तणावात वृद्ध इसमाची आत्महत्या

खारगर: बँक कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका वृध्द इसमाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाच्या थकीत हप्त्याच्या वसुलीसाठी बँक कर्मचारी तगादा लावत धमकावल्याने आत्महत्या केली असल्याची समोर आले आहे.

दिलेली माहिती अशी, मयत व्यक्तीच्या सुनेने व इतर ४ जणांनी खारघर येथील ग्रेटर बँकेतून ३ लाखांचे सामूहिक कर्ज काढले होते. या कर्जाचे काही हफ्ते फेडले असून लॉकडाऊनमुळे काही हप्ते शिल्लक होते. या उर्वरित हप्त्याच्या वसुलीसाठी बँकेचे कर्मचारी वारंवार घरी येऊन पैशांसाठी तगादा लावत होते. सोमवारीही अशाचप्रकारे बँकेचे २ महिला आणि १ पुरुष कर्मचारी मयत इसमाच्या घरी येऊन पैशासाठी तगादा लावत होते.

मात्र उद्या पैसे भरतो असे सांगूनही आताच पैसे भर नाहीतर आम्ही घरातील सामान घेऊन जातो अशी धमकी कर्मचारी देत होते. या तणावाखाली घरातील वृद्ध इसमाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चुकीच्या पद्धतीने वसुलीची प्रक्रिया झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे. याघटनेची अधिक चौकशी सुरू असून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply