पुण्यात खराडी येथे मिसळच्या हॉटेलसहित ८ दुकानांना भीषण आग; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

चंदननगर : नगररस्त्यावर खराडी जुना जकात नाका येथे रस्त्यावर असलेल्या जोगेश्वरी मिसळ व बाजूच्या फर्निचर मोबाईल शॉपी च्या दुकानाला आग लागून आत्तापर्यंत आठ दुकाने आगीत खाक झाली आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असून अद्याप आग आटोक्यात आलेली नाही. यात हॉटेल जोगेश्वरी मिसळ, दोन मोबाईल शॉप,तीन फार्निचर,हॉटेल एस कुमार यांना आग लागली आहे. आतापर्यंत चार आगीचे बंब आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सकाळी साडे नऊच्या दरम्यान ही आग लागली अग्निशामक दलाचे बंब उशिरा आल्याने आग आवाक्याच्या बाहेर गेली. आग लागल्याने नगररस्त्यावर मोठी वाहतुककोंडी झाली असुन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *