
मुंबई, पुणे : दोन वर्षे महासाथीमुळे दिवाळीत फटाक्यांचा ‘क्षीण क्षीण’ आनंद लाभलेल्या नागरिकांनी यंदा फटाक्यांची पुरती हौस भागविल्याचा परिणाम देशातील हवेच्या गुणवत्तेवर झाला आहे. शहरी भागांमध्ये हवा बिघडली असून दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर पोहोचली आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील शहरगावांमध्येही वातावरणावर अतिरेकी फटाक्यांचा परिणाम झाल्याचे ‘सफर’ या संस्थेने नोंदविले आहे.
सफर या संस्थेकडून देशभरातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यात येते. मंगळवारी दुपापर्यंत पुण्याच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक ते वाईट या स्तरावर होती. दुपारनंतर त्यात सुधारणा होऊन ती समाधानकारक पातळीवर गेली. तर मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट स्तरावर असल्याचे दिसून आले. येत्या दोन दिवसांत पुण्याच्या हवेची गुणवत्ता सुधारण्याची, तर मुंबईच्या हवेची गुणवत्ता वाईट पातळीवरच राहण्याचा अंदाज ‘सफर’कडून वर्तवण्यात आला आहे. तर देशातील सर्वात प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीर स्तरावर पोहोचली आहे. पुढील दोन दिवस दिल्लीतील हवेची गुणवत्ता गंभीरच राहण्याचा ‘सफर’चा अंदाज आहे.
सफरच्या नोंदींनुसार सोमवार-मंगळवारी मुंबईची हवा वाईट पातळीवर, तर पुण्याची हवा वाईट ते मध्यम पातळीवर असल्याचे दिसून आले.
आजारांना निमंत्रण..
हवेतील धूलीकणांचे प्रमाण वाढल्यास त्याचा कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांना धोका असतो. करोना आटोक्यात आला असला, तरी पावसाळय़ापासून राज्यभरात दीर्घकाळ सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. सध्याच्या हवेत पुन्हा सर्दी-खोकला वाढण्याची भीती आहे.
एका आठवडय़ात..
गेल्या आठवडय़ात मुंबई, पुणे, दिल्ली आणि अहमदाबाद या चार शहरांच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक पातळीवर होती. मात्र एकाच आठवडय़ात हवेच्या गुणवत्तेत बदल झाल्याचे दिसून येत आहे.
थोडी माहिती..
सफरच्या हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार (एक्यूआय) ५० पर्यंत एक्यूआय असलेली हवा चांगली, १०० ते २०० एक्यूआयदरम्यानची हवा सर्वसाधारण पातळीहून कमी, २०० ते ३०० एक्यूआयदरम्यानची हवा वाईट, ३०० ते ४०० एक्यूआय दरम्यानची हवा अत्यंत वाईट आणि ४०० एक्यूआयवरील हवा गंभीर मानली जाते.
काय झाले?
पावसामुळे हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांचे जमिनीवर राहात असल्याने हवेची गुणवत्ता चांगली असते. मात्र पावसाळा सरल्यानंतर गेल्या काही दिवसांत वाढलेल्या वाहनांच्या धुरामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. तसेच दिवाळीमुळे करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही वातावरण धूरग्रस्त झाले आहे.
काळजीसाठी काय?
हवेची गुणवत्ता सर्वसाधारण पातळीपेक्षा कमी असताना श्वास घेण्यास त्रास, दम लागणे असे प्रकार होऊ शकतात. तर वाईट पातळीवर असताना जास्त काळ घराबाहेर राहणे अपायकारक ठरू शकते. सध्या घराबाहेर मुखपट्टीचा वापर आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




