पुण्यात सार्वजनिक शौचालयात बलात्कार, पाठलाग करून नराधमाने साधला डाव

पुण्यात विनयभंग आणि बलात्काराच्या घटना सातत्याने वाढत असल्याचं समोर आलंय. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात १२ वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित मुलगी कुटुंबीयांसह साफसफाईची कामं करते. सार्वजनिक शौचालयात गेल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग केला. यानंतर तिच्यावर अत्याचार करून घटनास्थळावरून पळ काढला.

पीडित मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी मारवाडी नामक एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हा पीडितेच्या कुटुंबीयांचा ओळखीचा आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *