
पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशभरातील अनेक राज्यांमध्ये कारवाई केली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी नियोजित आंदोलनाच्याआधीच ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घोषणाबाजीचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनीही या वादात उडी घेतली आहे.
पुण्यातील मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयविरोधात एनआयएने केलेल्या कारवाईविरोधातील आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलीस काही कार्यकर्त्यांना गाडीमध्ये बसवून घेऊन जात असतानाच रस्त्यावर जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या नावाने घोषणाबाजी केली. आंदोलकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात ‘आरएसएस मुर्दाबाद’ अशीही घोषणाबाजी केली.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार या घोषणाबाजी प्रकरणात पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि ६० ते ७० पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झाल्याचा उल्लेख यामध्ये पोलिसांनी केला आहे.
या सर्व प्रकरणावर भाष्य करताना अतुल भातखळकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केलं आहे. तसेच त्यांनी ठाकरे, सुळे आणि पवार या नावांचाही उल्लेखही केला आहे. ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या बातमीची लिंक शेअर करत भातखळकर यांनी, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह पीएफआयची विषवल्ली ठेचत आहेत. पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी झाली (यावर) पवार, सुळे, ठाकरे मूग गिळून बसलेत,” असं म्हटलं आहे.
भातखळकर यांच्या या ट्वीटवर अनेक शिवसैनिकांनी केंद्रात, राज्यात आणि पुण्यामध्ये भाजपाचीच सत्ता असल्याची आठवण रिप्लायमध्ये करुन दिली आहे. अनेकांनी भातखळकर यांना सत्ताधाऱ्यांना जाब विचारायला हवा असं म्हणत दरवेळेस तुम्ही ठाकरे, पवार यांच्यावरच टीका करता असंही म्हटलं आहे. “फडणवीस झोपा काढतात का?”, असा प्रश्न एकाने विचारला आहे. तर दुसऱ्याने “पुण्यात सत्ता कोणाची आहे?” असा प्रश्न भातखळकरांना विचारा आहे. नुसत्या ठाकरेंच्या नावाने बोबा मारायच्या असा टोला भूपेंद्र मोरे यांना शिवसेना समर्थकाने ट्वीटला रिप्लाय देताना लगावला आहे. “केंद्रात, राज्यात नामर्द सरकार असल्याने या घटना घडत आहेत,” अशी टीका अन्य एका शिवसेना समर्थकाने रिप्लायमध्ये केली आहे. “बेकायदेशीर सरकार आहे तर पाकिस्तान जिंदाबाद काय तालिबानी जिंदाबाद बोलेलं तरी काही नवल वाटायला नको,” असा रिप्लाय सुदेश नावाच्या सेना समर्थकाने दिला आहे.
शहर
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
- हैदराबाद हादरले! आंबे खाल्ल्यानंतर दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; 'फूड पॉयझनिंग'चा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
महाराष्ट्र
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- पुणे: रोबोटिक गुडघा शस्त्रक्रिया: वेदनामुक्त हालचालींसाठी पुण्याच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवी आशा
- मान्सूनचा 'विलंब'! 'एल निनो'च्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाची कमतरता; जुलै महिन्यानंतरच पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज.
- हैदराबाद हादरले! आंबे खाल्ल्यानंतर दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; 'फूड पॉयझनिंग'चा संशय, पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
गुन्हा
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
- मुलुंड: फ्लॅट खरेदीदारांची दीड कोटींची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, पुनर्विकास प्रकल्पात मोठा गंडा!
राजकीय
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
- मध्य प्रदेश राज्यसभा निवडणूक: काँग्रेसचा उमेदवारी अर्ज बाद; भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.
- एआयचे 'पाणी' संकट: तुम्ही वापरत असलेले एआय १.३ अब्ज लोकांचे पाणी पिणार? डेटा सेंटर्सविरोधात जगभरात संतापाची लाट!
























Subscribe to my channel


