पुण्यातील खळबळजनक घटना; भररस्त्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून धक्कादायक घटना घडली आहे. दौंड शहरात भररस्त्यात एका तरुणाची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर संशयित आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर चितारे (वय २४, दौंड) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हुतात्मा चौकातून तिसर्या कुरकुंभ मोरी कडे जाताना उजव्या बाजूला प्रकाश चायनीज हॉटेल जवळ सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा मयूरची हत्या करण्यात आली आहे.

वर्दळीच्या रस्त्यावर धारदार शस्त्राने मयूरच्या हात, पाय, छाती व मानेवर सपासप वार करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यानंतर घटनास्थळावरून दौंड पोलिसांनी मयूर चितारे याला रिक्षातून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मयूर चितारे याच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी अर्जुन स्वामी काळे (वय २६, दौंड) हा स्वतःहून दौंड पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *