
पुणे : राज्यात आगामी काळात महत्त्वाच्या पालिका निवडणुका होऊ घातल्या असून त्याअनुषंगाने सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण हळूहळू तापू लागलं आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत कुरघोडी करण्याचा प्रयत्न राजकीय नेतेमंडळी करताना दिसत आहेत. एकीकडे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असे शिवसेनेतलेच दोन गट एकमेकांना भिडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत त्यांना ‘डिलीव्हरी बॉय’ची उपमा दिली आहे. त्यामुळे यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत असला, तरी त्याही वातावरणात राजकीय टोलेबाजी मात्र चालूच आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘तीन महिन्यांपूर्वीच आम्ही फटाके फोडले’ असं म्हणत ठाकरे सरकार पाडल्याच्या घटनेचा संदर्भ दिल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र, त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनाच शिंदे गट प्रमुख मानत असताना आणि भाजपाकडूनही एकनाथ शिंदेंचा उल्लेख सातत्याने त्याच संदर्भात केला जात असताना नेमक्या याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष आणि पुण्याचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी लक्ष्य केलं आहे.
पुण्याचे माजी महापौर राहिलेले प्रशांत जगताप यांनी आपल्या ट्विटर हँडलवरूर एकनाथ शिंदेंना लक्ष्य करणारं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदार फोडून भाजपाच्या गोटात सामील केल्याचा आरोप केला आहे. “अनेकांना वाटलं शिंदे साहेब लीडर आहेत. पण प्रत्यक्षात मात्र ते केवळ डिलीव्हरी बॉय निघाले. शिवसेनेतून आमदार भाजपामध्ये सुखरूप पोहोचवण्याचं काम ते करतायत”, अशा शब्दांत प्रशांत जगताप यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं आहे.
शहर
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
- दौंडमध्ये हॉटेल ओएसिसमध्ये राडा! सहजापूर फाट्यावर तुफान हाणामारी; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्र
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- सांगलीत काळाचा घाला! जत तालुक्यात भिंत कोसळून ६ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; मुसळधार पावसाने घातला धुमाकूळ
- मुंब्र्यात खळबळ! ठाणे महापालिकेच्या महिला डॉक्टरची सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
गुन्हा
- सोलापुरात ऐतिहासिक कारवाई! २ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; फिल्मी स्टाईलने तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- काळजाचा ठोका चुकवणारा थरार! चालकाला भोवळ आल्याने ६० प्रवाशांनी भरलेली बस उलटली
- NEET पेपर लीकचे पुणे कनेक्शन! ब्युटी पार्लर चालवणारी महिला अटकेत; ताबा सीबीआयकडे सोपवणार
- रक्ताच्या नात्याला काळिमा! पुण्यात चुलत भावानेच लुटले भावाचे घर; दागिने आणि रोकड लंपास
राजकीय
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
- भाजपला देशभर आग लावून निवडणुका जिंकायच्या आहेत; खासदार संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला
- सुनेत्रा पवारांची 'दिल्ली वारी'; राज्यसभा सदस्यत्वाचा आज राजीनामा? बारामती विजयानंतर सक्रिय राजकारणात मोठ्या निर्णयाची शक्यता
- राजकीय संघर्षात 'सॉफ्ट पॉवर'चा गेम; मुख्यमंत्री शिंदेंच्या अनपेक्षित भेटीनंतर ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, पल्लवी पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!






















Subscribe to my channel




