पुणे : राष्ट्रीय स्मारक आगाखान पॅलेसची पाणीपट्टीची थकबाकी पावणे दोन कोटी रुपयांवर पोहोचल्याने महापालिकेने दोन महिन्यांपासून या वास्तूचा पाणीपुरवठा बंद केला आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाने पैसे पाठवल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही, अशी भूमिका पॅलेस व्यवस्थापनाची आहे, तर एक कोटी रुपये थकबाकी भरल्याशिवाय आम्ही पाणी सुरू करणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. पुण्यातील प्रमुख ऐतिहासिक वास्तूंमध्ये आगाखान पॅलेसचा समावेश आहे. महात्मा गांधी सहा वर्षे राजकैदी म्हणून या वास्तूमध्ये राहिले. गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी आणि त्यांचे स्वीय सहायक महादेव भाई देसाई यांचे याच वास्तूमध्ये निधन झाले. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या वास्तूला बघण्यासाठी देशा-परदेशातील पर्यटकांची वर्षभर वर्दळ असते. काही वर्षांपूर्वी ही वास्तू राष्ट्रीय पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित झाली, तेव्हापासून केंद्र सरकार आणि महापालिका दोघांनीही वास्तूकडे दुर्लक्ष केले आहे. स्मारकाने गेल्या वर्षभरात महापालिकेची पाणीपट्टी भरलेली नाही. थकबाकीची रक्कम आता एक कोटी ७१ लाख ८३० रुपये झाली आहे. त्यामुळे महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी पाणीपुरवठा थांबवला. प्रशासकीय वादांमध्ये आगाखान पॅलेसची दुर्दशा झाली आहे. वास्तूच्या आवारातील फुलांची बाग पाण्याअभावी कोमेजली आहे. झाडे वाळली आहेत. पर्यटकांना पिण्यासाठी तर नाहीच, स्वच्छतागृहांसाठीदेखील पाणी उपलब्ध नाही. सुविधेअभावी पर्यटकांची गैरसोय होत आहे. 'पालिकेने घेतली चुकीची भूमिका'
'आगाखान पॅलेसला केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून निधी उपलब्ध होतो. पाण्यासाठी निधी मिळाला न मिळाल्याने थकबाकी वाढली. शहरातील एक प्रमुख स्मारक म्हणून सहकार्याची भूमिका घेण्याऐवजी महापालिकेने पाणी तोडून चुकीची भूमिका घेतली आहे. प्रशासनाने तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत करावा,' अशी मागणी ॲड. सुनील करपे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. पाण्याच्या तुटवड्यामुळे पर्यटकांचे हाल होत आहेत, पाण्याअभावी पॅलेसची बाग कोमेजली आहे. पाणी थांबवून प्रशासनाने राष्ट्रीय स्मारकाची मानहानी आणि साक्षात गांधीजींचा अपमान केला आहे, असे स्पष्ट मत करपे यांनी व्यक्त केले.
शहर
- ब्रिटनचा ऐतिहासिक निर्णय! १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी; ऑनलाइन सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
- मुंबई मेट्रोच्या कामांचा 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीच्या महसुलावर मोठा परिणाम
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
महाराष्ट्र
- मुंबई मेट्रोच्या कामांचा 'बेस्ट'ला फटका! बस थांबे तोडल्याने जाहिरातीच्या महसुलावर मोठा परिणाम
- पुणे-नाशिक महामार्गावर संतापजनक घटना; तरुणीला ओढून नेऊन कालव्यात फेकले, नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
- पाचोड पोलिसांची धडक कारवाई: अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या पिकअपवर छापा; ७.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हा
- कल्याणमध्ये क्रूरतेचा कळस! हुंड्यासाठी गर्भवती महिलेचे मुंडण, गरम पाण्याने चटके देत सासरच्यांनी केला छळ!
- सांगलीत गुन्हेगारीचा थरार; गुन्हेगारांची 'जेल हिस्ट्री' अन् पैशांच्या देवाण-घेवाणीचा फज्जा उडाल्याने एकाचा बळी!
- पालघर: सरकारी महिला कर्मचाऱ्यावर भररस्त्यात कोयत्याने ८ वार; आरोपी गजाआड, धक्कादायक कारण समोर
- पुणे: एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ४० हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक; हायटेक ठग अरविंद आरोगोंडाला पुणे पोलिसांकडून अटक.
राजकीय
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- इंधन दरांचा खेळ! पाकिस्तानमध्ये पेट्रोल स्वस्त तर भारतात महाग; दोन्ही देशांच्या दरामागचे अर्थकारण काय?
- बापरे! हवेतच दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; अपघातात ६ जणांचा मृत्यू, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर!
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- 'मी तुमच्या मुलीला मारलंय'; पतीने केली 'सिक्रेट वाईफ'ची निर्घृण हत्या; इन्स्टाग्राम स्टोरीवरून उघड झाले सत्य!
























Subscribe to my channel


