पुणे : महाविद्यालयीन युवकाची आत्महत्या; शनिवार पेठेतील घटना

पुणे : महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार पेठेत घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. सुदर्शन मारुती झरे (वय १८, रा. शनिवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

सुदर्शनचे आई-वडील नोकरी करतात. तो बारावीत आहे. सोमवारी सायंकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सातच्या सुमारास त्याचे आई-वडील कामावरुन परतले. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. त्यांनी त्याला हाक मारली. सुदर्शनने प्रतिसाद दिला नाही. दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला. तेव्हा सुदर्शनने प्रसाधनगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. सुदर्शनच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही, असे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *