
पुणे : पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाचा खून करून ४४ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औंध परिसरात घडली. हा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. औंध परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्यातील औंध परिसरात एका बिल्डिंग मध्ये ३ जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. औंध भागातील एका बिल्डिंगमध्ये नवरा बायको आणि मुलगा असे ३ मृतदेह सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयटी अभियंता असलेल्या तरुणाने बायको आणि आठ वर्षीय मुलाला पॉलिथीन बॅगने दाबून त्यांची हत्या केली आणि त्यांनर स्वतः गळफास घेतला आहे.
हा तरुण पश्चिम बंगालचा असल्याचे कळत असून सुदिप्तो गांगुली (वय ४४, रा. औंध) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तो टीसीएस कंपनीमध्ये कामाला होता. त्याने पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चतुर्श्रुंगी पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेजण हरविल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री दाखल झाली होती. गांगुली हा मंगळवारी रात्री फोन उचलत नव्हता. त्यामुळे त्याच्या बंगळुरू येथील भावाने मित्रांकरवी मंगळवारी रात्री सुदिप्तो, त्याची पत्नी आणि मुलगा हरविल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दिली.
बुधवारी सकाळी सुदिप्तोचा भाऊ पुण्यात आला. पोलिसांनी दुपारी सुदिप्तो गांगुली यांचे औंध परिसरातील घर गाठले. त्यावेळी त्यांना घरात तिघांचे मृतदेह आढळून आले. सुदिप्तोच्या मुलाच्या आणि पत्नीच्या तोंडाला पॉलिथीनची बॅग बांधलेली दिसून आली.या घटनेमागील कारण समजू शकले नाही. याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेची माहिती घेत आहेत.
सुदिप्तो हा आधी आयटी क्षेत्रात काम करत होता. तसेच ७-८ महिन्यांपूर्वी त्याने आयटी कंपनी मधील नोकरी सोडून एक व्यवसाय करायचे ठरवले होते. याच व्यवसायात त्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे
बायको आणि मुलाला सुदीपतोने विष दिले आणि त्यानंतर त्यांचे पॉलिथिन बॅगने तोंड आवळून निर्घृण हत्या केल्याचा संशय व्यक्त होतो आहे. दरम्यान घरातून कुठलीही सुसाईड नोट अद्याप सापडलेली नाही.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

