पुणे : मंतरवाडी चौकातील खड्डे वाहतूक पोलिसांनी बुजविले

उंड्री : संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील मंतरवाडी चौकातील खड्डे बुजवून वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांचा मार्ग सुकर केला. राष्ट्रीय महामार्ग आणि महापालिका प्रशासनाकडून खड्डे दुरुस्तीला मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकून रस्त्यातील खड्डे बुजवून वाहतूक सुरूळीत केली. हांडेवाडी वाहतूक पोलीस शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी साळुंखे, पोलीस हवलदार विलास कांबळे, संदीपकुमार गोवेकर, भरत धुमाळ, पोलीस नाईक चंद्रकांत महाजन, रोहित करणे यांनी मुरूमाचा ट्रक थांबवून जेबीसीच्या साहाय्याने रस्त्यातील खड्डे बुजविले.

दरम्यान, वाहतूक पोलीस खड्डे बुजविताना पाहून वाहनचालकांनी राष्ट्रीय महामार्ग आणि महापालिका प्रशासनाला लाखोल्या वाहिल्या. आणखी किती अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला पालखी मार्ग रुंदीकरणासाठी कधी मुहूर्त मिळणार असा सवाल रिक्षाचालक पप्पू महापुरे आणि चालक शंकर मिसेकर यांनी उपस्थित केला.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *