पुणे - बिटकॉईन फसवणुक प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, उच्चस्तरीय तज्ज्ञांची चौकशी समिती नेमावी, रविंद्र पाटील याची मालमत्ता जप्त करावी अशी मागणी बिटकॉईन प्रकरणी फसवणुक झालेल्या गुंतवणुकदारांनी सोमवारी केली. तसेच बिटकॉईनच्या या प्रकरणामध्ये तब्बल दिड लाख कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करुन त्याची कसून चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
बिटकॉईन गुंतवणुकीत फसवणुक झालेल्या नागरीकांनी सोमवारी पत्रकार परिषदत घेत विविध प्रकारच्या मागण्या केल्या. यावेळी गुंतवणुकदारांच्यावतीने हेमंत दवे व निशा रायसोनी यांनी माहिती दिली. दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या बिटकॉईन फसवणुक प्रकरणी दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मुख्य सुत्रधार अमित भारद्वाज व इतरांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणाच्या तांत्रिक तपासासाठी सायबर तज्ज्ञ म्हणून नेमलेल्या पंकज घोडे व रविंद्र पाटील यांनीच पोलिसांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत तक्रारदार व आरोपींच्या वॉलेटमधील बिटकॉईन स्वतःच्या वॉलेटमध्ये वर्ग करीत पोलिसांचीही फसवणूक केली. या प्रकरणात केवळ त्यांचाच सहभाग नसून तत्काली पोलिस अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचा आरोप गुंतवणुकदारांनी केला.
या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय तज्ञांची समिती नियुक्त करावी अशी मागणी त्यांनी केली. याबरोबरच बिटकॉईन प्रकरणात अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि विवेक भारद्वाज यांचा सहभाग असून त्यांनी लाखो बिटकॉईनचा अपहार केलेला आहे. भारद्वाज बंधूनी केलेल्या बिटकॉईन चोरीच्या प्रकरणात त्यांच्यावर महाराष्ट्रासह देभरात ४२ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून तब्बल दिड लाख कोटी रुपयांचा हा गैरव्यवहार आहे. पोलिसांनी ब्लॉकचेनमध्ये बिटकॉईनचे व्यवहार अचूकपणे तपासण्यासाठी चैन अनॅलिसीस सॉफ्टवेअरची मदत घ्यावी. रवींद्र पाटील याने त्याच्या ‘केपीएमजी’ कंपनीच्या माध्यमातुन किती बिटकॉईन लंपास केले, याचा सखोल तपास करावा, त्यांच्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि पाटीलची मालमत्ता जप्त करावी, अशीही त्यांनी मागणी केली आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




