पुणे : पुणे जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कुटुंबातील घरांची मालकी महिलांकडे आली आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने गाव पातळीवर राबविण्यात आलेल्या गावातील मिळकतीच्या (मालमत्ता) फेरफार मोहिमेत तब्बल सहा लाख ४२ हजार ८६ घरांच्या सातबारा उतारा आणि आठ अ उताऱ्यांवर महिलांच्या नावांची नोंद करण्यात आली आहे. जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभांमध्ये घरांची मालकी महिलांच्या नावे करण्यासाठी जिल्ह्यात खास महाफेरफार मोहीम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार या मोहिमेत या नोंदी केल्या असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.
महिलांच्या नावे घरांची मालकी या मोहिमेत जिल्ह्यात सर्वाधिक जुन्नर तालुक्यात ७७ हजार ८५ महिलांना घरांची मालकी मिळाली आहे. त्यामुळे या मोहिमेत जुन्नर तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. मिळकतींवर महिलांची मालकी या मोहिमेला सर्वात कमी प्रतिसाद वेल्हे तालुक्यात मिळाला आहे. या तालुक्यातील १५ हजार ७६१ घरे महिलांच्या नावे नोंदली गेली आहे.
या मोहिमेत महिलांच्या नावे घरांची मालकीबरोबरच महिला सुरक्षा, गावातील महिलांचा होणारा घरगुती हिंसाचार रोखणे, बालविवाह व हुंडा पद्धतीला आळा घालणे, लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारण्यासाठी आदी महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या मोहिमेला गाव पातळीवर चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाला चांगले यश आले आहे.
गावा-गावांतील प्रॉपर्टी कार्डवर महिलांचे नाव देणे आणि त्याचे वितरण करणे, काही गावांमध्ये अद्ययावत प्रॉपर्टी कार्डचे वाटप करणे, महिला कृषी कामगारांच्या समस्या सोडविणे, महिलांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणे, गावा-गावातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, गावातील सर्व महिलांना बचत गटाचे सदस्य करणे, प्रत्येक गावात एक महिला बचत गट एक उत्पादन संकल्पना राबविणे, गावातील महिलांची सुरक्षा, घरगुती हिंसाचार रोखणे, बाल लैंगिक अत्याचाराला आळा घालणे, गावातील लिंग गुणोत्तर (मुला-मुलींचे प्रमाण) प्रमाणात सुधारणा करणे, बालविवाह व हुंडा पद्धतीला आळा घालणे आणि सुरक्षित मासिक पाळीच्या स्वच्छतेच्या पद्धतींना प्रोत्साहन देणे आदी महिला सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेल्या मुद्यांवर विशेष भर देण्यात आला.
महाफेरफार मोहीम अभियान दृष्टीक्षेप
- जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कुटुंबांची संख्या --- १० लाख ९१ हजार ३०
- घरांची मालकी महिलांच्या नावे झालेली कुटुंबे --- ६ लाख ४२ हजार ८६
- जिल्ह्यात अव्वल ठरलेला तालुका --- जुन्नर (७७ हजार ८५)
- सर्वात कमी नोंदींचा तालुका --- वेल्हे (१५ हजार ७६१)
- आंबेगाव --- ३९ हजार ८८७
- खेड --- ६६ हजार ६४०
- जुन्नर --- ७७ हजार ८५
- शिरूर --- ६६ हजार ४३८
- दौंड --- ५८ हजार २२१
- बारामती --- ४७ हजार ८३७
- इंदापूर --- ५४ हजार २५७
- पुरंदर --- ३७ हजार २३१
- भोर --- ३१ हजार ९२०
- हवेली --- ५३ हजार ९०७
- मुळशी --- ५२ हजार २२३
- मावळ --- ४० हजार ६७९
- वेल्हे --- १५ हजार ७६१
- एकूण --- ६ लाख ४२ हजार ८६
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
महाराष्ट्र
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- मुंबई: मृणालताई गोरे उड्डाणपूल विस्तारीकरण वादाच्या भोवऱ्यात; निकृष्ट दर्जाच्या पृष्ठभागावरून मुंबईकरांचा संताप!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- जळगाव: काळाचा क्रूर खेळ! कार-एसटी आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; दोन आनंदी संसार उध्वस्त.
गुन्हा
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
- गडचिरोली: माणुसकीला काळीमा! नवीन घराच्या गच्चीवर ७ वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग; नराधम पेंटरला बेड्या
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- पीएम किसान २३ वा हप्ता: शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये कधी जमा होणार?
- "भारताच्या अण्वस्त्र धोरणात ऐतिहासिक बदल; एकूण अण्वस्त्रांची संख्या १९० वर, शेजाऱ्यांना धडकी!"
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!

























Subscribe to my channel


