पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ आता अवघा सात दिवस उरला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ येत्या २० मार्चला संपुष्टात येत आहे. येत्या सोमवारपासून (ता.२१) जिल्हा परिषदेवर प्रशासकराज येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हेच नवीन पदाधिकारी सत्तारूढ होईपर्यंत प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. यामुळे तब्बल ३२ वर्षांच्या खंडानंतर पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक येणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या गटातील (मतदारसंघातील) प्रलंबित कामांची किमान प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हा परिषद मुख्यालयात धावपळ सुरू केली आहे. परिणामी जिल्हा परिषदेतील सर्वच विभागात सध्या कामांची लगीनघाई सुरू झाल्याचे चित्र जिल्हा परिषद मुख्यालयात पहावयास मिळू लागले आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने प्रशासक नियुक्तीबाबतचे राजपत्र प्रसिद्ध केले आहे. या राजपत्रात राज्यातील २५ जिल्हा परिषदांवर येत्या २१ मार्चपासून किमान चार महिने किंवा नवीन पदाधिकारी सत्तारूढ होईपर्यंत जिल्हा परिषदेच्या कारभार हा प्रशासक पाहील, असे नमूद केले आहे. या राजपत्रामुळे पुढील किमान चार महिने तरी जिल्हा परिषदेचा कारभार हा प्रशासकाच्या हाती राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्हा परिषदेवर याआधी १९९० मध्ये प्रशासकराज आले होते. त्यावेळी ३० जून १९९० ते २० मार्च १९९२ पर्यंत म्हणजेच सुमारे पावणे दोन वर्षे जिल्हा परिषदेचा कारभार हा प्रशासकाच्या हाती होती. त्यानंतर यंदा येत्या २१ मार्चपासून म्हणजेच तब्बल ३२ वर्षांनी पुन्हा जिल्हा परिषदेवर प्रशासकराज येत आहे.
देशातील पंचायतराज संस्थांना अधिकाधिक स्वायत्तता देण्यासाठी आणि केंद्र व राज्य सरकारच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने ७३ वी घटनादुरुस्ती केली आहे. या घटनादुरुस्तीतील नियमांची अंमलबजावणी १९९४ पासून केली जात आहे. या घटनादुरुस्तीतीमधील तरतुदीनुसार पंचायतराज संस्थांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी घेण्याचे बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना मुदतवाढ देता येत नाही. विद्यमानांना मुदतवाढ देण्यात असलेल्या कायदेशीर अडचणी आणि मुदतीत निवडणुका घेणे अशक्य असल्याने जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेची याआधीची पंचवार्षिक निवडणूक १५ फेब्रुवारी २०१७ ला झाली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे नवे सभागृह २१ मार्च २०१७ ला अस्तित्वात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाची पहिली बैठक २१ मार्च २०१७ ला झाली होती. त्यामुळे येत्या २० मार्च २०२२ ला या सभागृहाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याचे राजपत्रात नमूद करण्यात आले आहे.
आयुष प्रसाद दुसऱ्यांदा झेडपीचे प्रशासक
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे पुणे जिल्हा परिषदेत येण्यापूर्वी विदर्भातील अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यावेळी अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक नियोजित मुदतीत घेता आली नव्हती म्हणून अकोला जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. साहजिकच मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने तेथील प्रशासकपदी आयुष प्रसाद यांची नियुक्ती झाली होती. तेथील प्रशासकाची कारकीर्द संपल्यानंतर प्रसाद यांची पुणे जिल्हा परिषदेत बदली झाली. योगायोगाने आता पुणे जिल्हा परिषदेची निवडणूकही मुदतीत होणे अशक्य झाले आहे. त्यामुळे आता येथेही प्रसाद हेच प्रशासक असणार आहेत. परिणामी त्यांना सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेचा प्रशासक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.हे पण वाचा-
शहर
- गडचिरोलीत फसवणुकीचे साम्राज्य! सरकारी नोकरीच्या आमिषाने शहीद जवानाच्या मुलाला लुटले; कोट्यवधींच्या फसवणुकीनंतर आरोपी फरार!
- पुण्यात पावसाचा जोर; पाणी साचल्याने बससेवेचे बारा वाजले; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएलचे पर्यायी मार्ग निश्चित!
- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचा मार्ग मोकळा; वाटेगाव येथील ५ एकर जागेवर अखेर शासनाचे नाव! create landscape image no text on image no collage image
- ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!
महाराष्ट्र
- गडचिरोलीत फसवणुकीचे साम्राज्य! सरकारी नोकरीच्या आमिषाने शहीद जवानाच्या मुलाला लुटले; कोट्यवधींच्या फसवणुकीनंतर आरोपी फरार!
- पुण्यात पावसाचा जोर; पाणी साचल्याने बससेवेचे बारा वाजले; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपीएलचे पर्यायी मार्ग निश्चित!
- लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाचा मार्ग मोकळा; वाटेगाव येथील ५ एकर जागेवर अखेर शासनाचे नाव! create landscape image no text on image no collage image
- ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!ठरलं! २२ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन; १० जुलैपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात राजकीय खडाजंगीची शक्यता!
गुन्हा
- पुणे: एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली ४० हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक; हायटेक ठग अरविंद आरोगोंडाला पुणे पोलिसांकडून अटक.
- अकोला:भीषण हत्याकांडाने खळबळ; पूर्ववैमनस्यातून २९ वर्षीय अंकुश गवळीची चाकूने भोसकून हत्या.
- तुरुंग निरीक्षकाचा घरात आढळला मृतदेह; पत्नीचे महासंचालकांवर (DGP) मानसिक छळाचे गंभीर आरोप
- लंडनमध्ये लातूरच्या इंजिनीयरची आत्महत्या; कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल
राजकीय
- चंद्रपूर काँग्रेसमध्ये राजकीय वादळ; धानोरकर-वडेट्टीवार यांच्या दोन 'व्हीप'मुळे नगरसेवक संभ्रमात!
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
इतर
- आजचे राशिभविष्य १४ जून २०२६: बाप्पा आणि हनुमानजींच्या कृपेने कोणत्या राशींचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- 'टीएमसी' कुणाची? ममता बॅनर्जींच्या पक्षात फूट; बंडखोर खासदारांची आता पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची तयारी!
- 'मी तुमच्या मुलीला मारलंय'; पतीने केली 'सिक्रेट वाईफ'ची निर्घृण हत्या; इन्स्टाग्राम स्टोरीवरून उघड झाले सत्य!
- कापूस आयात शुल्कातील ११ टक्के कर रद्द; ऑक्टोबरपर्यंत दरात स्थिरता राहण्याची शक्यता.
- बंजी जम्पिंगचा थरार अंगलट; सुरक्षा दोर बांधायला विसरल्याने तरुणीचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल.

























Subscribe to my channel



